?ऑक्टोबर – संपादकीय  ?

शं. वा. किर्लोस्कर ( ‘शंकर वासुदेव किर्लोस्कर) यांचा जन्म ८ ऑक्टोबर १८९१ साली झाला. किर्लोस्कर मासिकाचे ते संस्थापक आणि संपादक होते. सुरूवातीला ते ‘किर्लोस्कर खबर’ ही पत्रका काढत. कारखान्यात तयार होणार्‍या मालाच्या जाहिरातीसाठी प्रथम ‘किर्लोस्कर खबर’ ही पत्रिका सुरू झाली. त्या नंतर त्यातून ‘‘किर्लोस्कर’ हे मासिक परिणत झाले. पुढच्या काळात स्त्री व मनोहर ही मासिके निघाली. महाराष्ट्राच्या नियतकालिकांच्या इतिहासात  या मासिकांचे स्थान अतिशय महत्वाचे आहे. महाराष्ट्राची  संस्कृती आणि कालमानानुसार त्यात झालेले बदल याचे दर्शन या मासिकांमधून घडते. ‘शंवाकीय’ हे त्यांचे आत्मकथन आसलेले पुस्तक. यातून पाच दशकाचे महाराष्ट्राचे संस्कृतिक जीवन स्पष्ट होते. ते व्यंग चित्रकारही होते. ‘त्यांचे ‘टाकाच्या फेकी’ हे व्यंग चित्रांचे पुस्तकही त्या काळात अतिशय नावाजले गेले.

उद्धव शेळकेउद्धव शेळके हे वैदर्भीय लेखक कादंबरी लेखक म्हणूनते प्रसिद्ध आहेत. धग ही त्यांची कादंबरी खूप गाजली.’शिळान’ हा यांचा पहिला कथासंग्रह. वैदर्भीय ग्रामीण बोलीत त्यांनी लेखन केले. धुंदी, पुरुष, नांदतं घर, कोवळीक, इ. अनेक कादंबर्‍यांचे त्यांनी लेखन केले. त्यांचाही जन्मदिन आजचाच.

कमल पाध्ये –  या प्रभाकर पाध्ये यांच्या पत्नी. त्यांचे बंध- अनुबंध हे आत्मचरित्र खूप गाजले.

शैलजा राजे – या मरारीतल्या नामांकित व लोकप्रिय लेखिका. यांचा आज स्मृतिदिन. त्यांचे ३९ कथासंग्रह, ४३ कादंबर्‍या व २५ बालकथा- कादंबरिका व काही गद्य लेखन प्रसिद्ध आहे.मुखवटा, यज्ञ, आठवणींचे मोहोळ,आभास, अर्थहीन, बंधन इ. त्यांच्या गाजलेल्या कादंबर्‍या.

गोदावरी पारुळेकर – ठाणे जिल्ह्यातील आदिवासी भागात, त्यांच्यावर होणार्‍या अन्यायाबद्दल यांनी मोठाच लढा उभारला होता. त्या संघर्षावर आधारित त्यांनी ‘जेव्हा माणूस जागा होतो’, हे पुस्तक लिहिले. या पुस्तकाला ‘साहित्य अ‍ॅकॅडमीचा पुरस्कार मिळाला. या  संघर्शाच्या वेळी कायदा मोडल्याबद्दल त्यांना अटक करून तुरुंगात ठेवण्यात आले होते. तेथील स्त्रियांच्या कहाण्या ऐकून त्यांनी ‘बंदिवासाची आठ वर्षे हे पुस्तक लिहिले. यांचाही आज स्मृतिदिन.

श्रीमती उज्ज्वला केळकर

(ई-अभिव्यक्ती संपादक मंडळ)

संदर्भ : कर्‍हाड शिक्षण मंडळ ‘साहित्य साधना’ दैनंदिनी , गुगल गुरुजी

≈ संपादक – श्री हेमन्त बावनकर/सम्पादक मंडळ (मराठी) – श्रीमती उज्ज्वला केळकर/श्री सुहास रघुनाथ पंडित /सौ. मंजुषा मुळे ≈

image_print
0 0 votes
Article Rating

Please share your Post !

Shares
Subscribe
Notify of
guest

0 Comments
Inline Feedbacks
View all comments