मराठी साहित्य – आलेख ☆ चिमणीचा दात ☆ श्रीमती रंजना मधुकरराव लसणे
श्रीमती रंजना मधुकरराव लसणे
चिमणीचा दात
आजकाल डब्यात पोळी भाजी देण्यापेक्षा बरेचसे पालक मुलांना पाच दहा रूपये देण्यात धन्यता मानतात मग ही मुल चीप्स कुरकूरे इत्यादी फास्टफूड आणून खाण्यात नुसती धन्यताचा नव्हे तर श्रीमंचे लक्षण समजतात कुणाला एक कण न देता खातात तेंव्हा आपले लहानपणीचे दिवस आठवाल्या शिवाय राहात नाहीत. एखादा चिंचेचा आकडा, एखादा आवळा कधीकधी एकच चिंचोका सुद्धा चिमणीच्या दाताने दोनचार जणांना नक्कीच पुरत असे. तो देताना देणाऱ्याला कधीही श्रीमंतीचा गर्व नसायचा किंवा खाणार्यालाही कधीच गरीबी जाणवत नसे. प्रत्येक मित्रा जवळची प्रत्येक वस्तू सर्वांनाच आपली वाटायची. अगदी पूर्ण बिस्कीट पुडा एकट्याने खाल्ला आणलेले पूर्ण फळ एकट्याने फस्त केले अससस अगदी अभावानेच होई.
जी वस्तू चिरून मोडून फोडून देता येत नसे ती नक्कीच चिमणीच्या दाताने दिली जाई कारण आई सांगायची एकट्याने खाल्ले की वटवाघूळच्या जन्माला जाव लागत आणि मग असं एकट दिवसभर लटत राहावं लागतं. तेंव्हा ते अगदी मनोमन पटायचं कारण वटवाघुळाला कधी कुणी मजा करताना मित्रात बागडताना पाहिलेले नव्हते. म्हणूनच वाटून खाण्याची संस्कृती निर्माण झाली.परंतु वरचेवर ही संस्कृती लोप पावताना दिसते.
© रंजना मधुकर लसणे
आखाडा बाळापूर, जिल्हा हिंगोली
9960128105