सुश्री अपर्णा परांजपे
इंद्रधनुष्य
☆ ✍️ जागतिक मातृभाषा दिन… ☆ सुश्री अपर्णा परांजपे ☆
जागतिक मातृभाषा दिनाच्या हार्दिक शुभेच्छा 💐
प्रगल्भ अशी आपली मातृभाषा मराठीचा आपल्याला अभिमान आहे.
ॐ हे अक्षरब्रह्म आहे यातूनच शब्द निर्माण झालेत. आधी शब्द मग वाक्य वाक्य: संपूर्ण वाक्याचा सरळ अर्थ समजणे ही प्रक्रिया असते. जेवढं लिहिलंय, वाचलंय त्याचा सरलार्थ समजणे.
महावाक्य: ज्ञानी व अनुभवी व्यक्तींच्या तोंडून बाहेर पडलेल्या शब्दांचा, वाक्यांचा अर्थ जरी समजला नाही तरीही त्यांच्याच कृपेने त्याची अनुभूती घेणे !
विज्ञान एक प्रमेय व त्याची सिध्दता देते, तद्वतच ऋषिंचे शब्द म्हणजे त्या शब्दांची सिध्दता असते.
“आपुल्या सारखे करिती तात्काळ”
हे वचन सिध्द आहे कारण ते स्वानुभवातून आलेले आहे.
नुसती कल्पना जरी करता आली या वचनांची तरीही समाधान वाटते.
“मंत्रे तीर्थे द्विजे देवे दैवज्ञे भेषजे गुरौ यादृशी भावना यस्य सिद्धिर्भवति तादृशी”
जशी आपली भावना व भाव असेल तसा अनुभव येतो कारण सिध्द केल्याशिवाय प्रमेयाला अर्थ नाही.
संगत्याग आणि निवेदन| विदेहस्थिती अलिप्तपण|
सहजस्थिती उन्मनी विज्ञान| हे सप्तही येकरूप. .
(||४:५:८|| दासबोध)
यातील प्रत्येक वाक्य समजू शकते पण ते महावाक्य असल्याने त्याचा अनुभव घेणे कल्याणकारी आहे.
असे स्वानुभवी सत्पुरुष भक्ताला स्वतः सारखे करतात ह्यावर निरपेक्ष श्रध्दा म्हणजे ॐ या अक्षरब्रह्माला हृदयात साठवणे व त्याचा आनंद घेणे आहे.
अशी ही मराठी जिला मातेचा दर्जा आहे ती लेकराला तिच्या जवळ जे जे आहे ते प्रदान करण्यास तत्पर असते व आपले बालक आपल्यापेक्षाही सुखी व्हावे असा बहुमोल आशीर्वाद ही देते!
एकदा का मनाला हे पटले की काम झाले ह्यात शंका नाही.
भगवंत हृदयस्थ आहे 🙏
© सुश्री अपर्णा परांजपे
कात्रज, पुणे
मो. 9503045495
≈संपादक – श्री हेमन्त बावनकर/सम्पादक मंडळ (मराठी) – सौ. उज्ज्वला केळकर/श्री सुहास रघुनाथ पंडित /सौ. मंजुषा मुळे/सौ. गौरी गाडेकर≈