इंद्रधनुष्य
☆ दिवा संध्याकाळी किती वाजता लावावा.….किशोर अभ्यंकर ☆ संग्राहक – श्री अनंत केळकर ☆
(सांजवात ….एक अनुभव)
नमस्कार,
साधारण २५ वर्षापूर्वी मी आणि माझे पती पवई येथील चिन्मयानंद स्वामींच्या आश्रमात गेलो होतो . तेथील शंकर मंदिराच्या आवारात आम्ही बसलो असता ..तेथे बाजूला बसलेल्या एका अमराठी हिंदी भाषिक वयस्कर काकांनी पण आमच्या गप्पात भाग घेतला. त्यांनी एक महत्वपूर्ण माहिती दिली ती अशी—–
काका: आपण सर्वजण संध्याकाळी देवाला दिवा लावतो.
आम्ही : हो बहुतेक सर्व हिंदू लोकं.
काका : का लावतो?
आम्ही : पूर्व परंपरा, घरात लक्ष्मी येण्याची वेळ असते !
काका : वेळ कोणती ?
आम्ही : सूर्यास्तानंतर घरच्या गृहिणीच्या सवडीनुसार !
काका : असे का ?
मी: घरातल्या पुरुषवर्गांनी आम्हाला दिलेला हा एकमेव अधिकार.
काका: आता मी काय सांगतो ऐका… योग्य वाटल्यास त्याचे आचरण करा.. त्याची अनुभूती किंवा प्रचीती आल्यास इतरांना सांगा
काका: दिवा नेहमी संध्याकाळी ७.३७ मिनिटांनी लावावा.
आम्ही: ७.३७ च का? सर्वांची घड्याळे सारखी नसतात … मग त्याचे काय?
काका : असे सांगितले जाते की जगाची जगन्माता श्री कामाक्षीदेवीच्या मंदिरात तेजोवात अखंड तेवत असते परंतू तेथेही एक सांजवात संध्याकाळी ७.३७ वाजता लावली जाते. ती सांजवात सूक्ष्म रूपाने अखंड भारत वर्षात घरोघर जाऊन जेथे जेथे दिवा लागला असेल त्या घराचे क्षेम कुशल विचारून पुन्हा जगन्माता श्री कामाक्षीदेवीच्या मंदिरात तेवत असलेल्या तेजोवातीमध्ये विलीन होते. त्या घराची, घरधन्याची सुख-दुःखे सांगते. आई कामाक्षी देवी त्याप्रमाणे सर्व अमंगल, अडचणी दूर करते.
आम्ही: ह्या विज्ञान युगात हे खरे कोण मानणार. ह्यावर कोण विश्वास ठेवणार?
काका : तुम्ही तर ठेवाल ना ? तुम्हाला अनुभव आल्यावर इतरांना सांगा किंवा मी नेहमी येथेच असतो मला येऊन सांगा !
आम्ही त्याप्रमाणे दररोज संध्याकाळी ७.३७ ला दिवा लावणे सुरु केले. खरं सांगू का? काही दिवसाच्या आत आमच्या घरात, आमच्या आर्थिक परिस्थितीत आमूलाग्र बदल झाला. हा अनुभव आम्ही इतरांना सांगितला …त्यानाही खूप चांगला अनुभव आला … तुम्हालाही असा अनुभव येवो ही इच्छा!
हा आमचा अनुभव ऐकायला ते काका त्या दिवसापासून तेथे आजतागायत दिसले नाहीत.
आई कामाक्षी देवी तुम्हा सर्वांचे भले करो !!!
– किशोर अभ्यंकर
संग्राहक : श्री अनंत केळकर
≈संपादक–श्री हेमन्त बावनकर/सम्पादक मंडळ (मराठी) – श्रीमती उज्ज्वला केळकर/श्री सुहास रघुनाथ पंडित /सौ. मंजुषा मुळे ≈