श्री अमोल अनंत केळकर
इंद्रधनुष्य
☆ गूगल मॅप ☆ श्री अमोल अनंत केळकर ☆
आपण कार चालवत असताना गुगल मॅप वापरतो. गुगल मॅपने चालताना जर ड्रायव्हर मॅपप्रमाणे वळण न घेता पुढे गेला, तर गुगल मॅपचा निवेदक रागवत नाही. चुकीवर बोलत बसत नाही. तर मॅप “रिरुट” करतो. पुन्हा योग्य आणि जवळचा मार्ग गुगल मॅप सांगतो.
जीवनातील असंच एखादं वळण चुकलं, तर त्याची चूक काढत बसण्यापेक्षा
आपणही स्वतःला किंवा आपल्या संपर्कातील लोकांना “रिरुट” करायला शांतपणे आणि सहजपणे “भाग” पाडले पाहिजे.
झालेल्या चुकांवर भर देऊन निराशाजनक वातावरण तयार करण्यापेक्षा
“रिरूट ” करून आशादायी वातावरण तयार करणे कधीही चांगले…
संग्राहक – श्री अमोल अनंत केळकर
बेलापूर, नवी मुंबई, मो ९८१९८३०७७९
poetrymazi.blogspot.in, kelkaramol.blogspot.com
≈संपादक–श्री हेमन्त बावनकर/सम्पादक मंडळ (मराठी) – श्रीमती उज्ज्वला केळकर/श्री सुहास रघुनाथ पंडित /सौ. मंजुषा मुळे ≈