श्री मोहन निमोणकर
इंद्रधनुष्य
☆ “असाही एक आंतरराष्ट्रीय स्मरणदिन…” – माहिती संग्राहक : अज्ञात ☆ प्रस्तुती – श्री मोहन निमोणकर ☆
गुलाम व्यापारातील बळींचा आंतरराष्ट्रीय स्मरण दिन ::: 25 मार्च हा दिवस “आंतरराष्ट्रीय स्मरण दिन” म्हणून साजरा केला जातो.
हा दिवस प्रथम 2008 साली साजरा करण्यात आला, 400 वर्षांहून अधिक काळ अमानुषपणे छळ झालेल्या जवळ-जवळ 15 दशलक्षाहून अधिक गुलामांना ज्यात पुरुष, महिला आणि मुले यांचेही बळी गेले होते त्यांना हा दिवस स्मरण आणि सन्मानित करतो.
“मानवाधिकारांचे इतिहासातील सर्वात वाईट उल्लंघन” गुलामांच्या व्यापारामुळे केले गेले असे आपल्याला इतिहासच सांगतो. गुलामांचा व्यापार हा जगातील सर्वात मोठा सक्तीचा क्रूर व्यापार होता. 400 वर्षांहून अधिक काळ, आफ्रिकन लोकांचे मोठ्या प्रमाणावर निर्गमन जगभरात अशा प्रकारे पसरले जे यापूर्वी कधीही पाहिले गेले नव्हते किंवा मानवी इतिहासात नोंदवले गेले नव्हते.
सन 1501 आणि 1830 च्या दरम्यान अमेरिकन लोकसंख्येत युरोपियन लोकांपेक्षा आफ्रिकन लोकांची वाढ जास्त झाली.
माहिती संकलक : अज्ञात
प्रस्तुती : श्री मोहन निमोणकर
संपर्क – सिंहगडरोड, पुणे-५१ मो. ८४४६३९५७१३.
≈संपादक – श्री हेमन्त बावनकर/सम्पादक मंडळ (मराठी) – सौ. उज्ज्वला केळकर/श्री सुहास रघुनाथ पंडित /सौ. मंजुषा मुळे/सौ. गौरी गाडेकर≈