इंद्रधनुष्य
☆ स्वामी ललितराम दास….सुश्री मंजुषा जोगळेकर ☆ सुश्री वीणा छापखाने☆
हे आहेत स्वामी ललितराम दास महाराज. केदारनाथ धाम येथे गेल्या १५ वर्षांहून अधिक काळ हे तप साधना करीत आहेत. हा यांचा या दोन तीन दिवसांतीलच फोटो आहे. जेव्हा केदारनाथ मंदिराचे दरवाजे उघडले जातात, तेव्हा हे तिथे येणार्या यात्रेकरूंची सेवाही करतात. या वर्षी ८००० पेक्षा जास्त यात्रेकरूंना यांच्यातर्फे मोफत भोजन दिलं गेलं. ५००० भाविकांची रात्रीच्या मुक्कामाची सोय केली गेली. तसेच, ६० पेक्षा अधिक निराधार पशूंचीही यांनी सेवा केली. जेव्हा येथे यात्रा येतात तेव्हा यांच्या आश्रमाचं हे कार्य सुरू असतं. त्यामुळे येथे येणारा कोणीही उपाशी रहात नाही. आणि रात्री उघड्यावर राहण्याची कोणावरही वेळ येत नाही. आश्रमाची गोशाळाही आहे. आता केदारनाथ मंदिर बंद झालं आणि आता हे महाराज इथे बसून तपस्या करीत आहेत. काही दिवसांनी इथले फोटो येतील तेव्हा त्यांच्या मानेपर्यंत बर्फाचं साम्राज्य दिसेल आणि मग या पांढर्या विश्वात त्यांचे फक्त काळे केस दिसतील. अशा तपसाधना करणार्या सर्वांना माझा नमस्कार, या सर्वांच्या तपश्चर्येची स्पंदने या जीवसृष्टीसाठी वरदान आहेत.
— मंजुषा जोगळेकर
संग्राहिका : सुश्री वीणा छापखाने
≈संपादक–श्री हेमन्त बावनकर/सम्पादक मंडळ (मराठी) – श्रीमती उज्ज्वला केळकर/श्री सुहास रघुनाथ पंडित /सौ. मंजुषा मुळे ≈