इंद्रधनुष्य
☆ राग आणि त्यांच्या श्रवणाचे लाभ (भाग पहिला) ☆ प्रस्तुती – श्री अरूण कुलकर्णी ☆
☆ MUSIC IS MEDICINE ☆
१ राग दुर्गा – आत्मविश्वास वाढविणारा.
२ राग यमन – कार्यशक्ती वाढवणारा.
३ राग देसकार – उत्थान व संतुलन साधणारा.
४ राग बिलावल – अध्यात्मिक उन्नती व संतुलन साधणारा.
५ राग हंसध्वनी – सत्य असत्याची जाणिव करून देणारा राग.
६ राग शाम कल्याण – मुलाधार उत्तेजीत करणारा व आत्मविश्वास वाढविणारा.
७ राग हमीर – आक्रमकता वाढविणारा, यश देणारा व शक्ती आणि उर्जा निर्माण करणारा.
८ राग केदार – स्वकर्तृत्वावर पूर्ण विश्वास निर्माण करणारून भरपूर उर्जा निर्माण करणारा तसेच मुलाधार उत्तेजित करणारा.
९ राग भूप – शांतता निर्माण करणारा व संतुलन साधून अहंकार संतुलनात आणणारा.
१० राग अहिरभैरव – शुद्ध इच्छा प्रेम आणि भक्तीभाव निर्माण करणारा व आध्यात्मिक उन्नतीस पोषक वातावरण निर्मिती करून समाधान देणारा.
११ राग भैरवी – इडा नाडी सशक्त करणारा भावनाप्रधान राग सर्व सदिच्छा पूर्णकरून प्रेम वृध्दिंगत करणारा असा सहस्त्राराचा राग.
१२ राग मालकंस – अतिशय शांत – मधुर राग प्रेमभाव निर्माण करणारा व संसारिक सुख वृध्दिंगत करणारा.
१३ राग भैरव – शांत वृत्ती व शुध्द इच्छा निर्माण करणारा राग हा आध्यात्मिक प्रगतीस पोषक असून शिवतत्व जाग्रुत करणारा असा आहे.
१४ राग जयजयवंती – सुख समृद्धि देणारा राग असून यश दायक आहे विशुद्धीच्या सर्व समस्या दूर करण्याची क्षमता बाळगतो.
१५ राग भिम पलासी – संसार सुख व प्रेम देणारा.
१६ राग सारंग – कल्पना शक्ती व कार्यकुशलता वाढीस लावून नवनिर्मितीचे ज्ञान प्रदान करतो आत्मविश्वास वाढीस लावून परिस्थितीचे भान देणारा अत्यंत मधुर राग.
१७ राग गौरी – शुध्द इच्छा, मर्यादाशीलता, प्रेम, समाधान, उत्थान इत्यादी गुणवर्धक राग. डाव्या विशुद्धीच्या सर्व बाधा नाहिशा करण.
☆ संगीतोपचार ☆
विशेष सूचना:- डाँक्टरांचे उपचार घेत असताना हे संगीतोपचारही घ्यावेत, पण डाँक्टरांचे उपचार मात्र थांबवू नयेत.
हृदयरोग – राग दरबारी व राग सारंग
१) झनक झनक तोरी बाजे पायलिया….८:१६ (मेरे हुजूर )
२) तोरा मन दर्पण कहलाए….६:०६ (काजल)
३) बहुत प्यार करते है ,तुमको सनम….४:२४ (साजन)
४) जादूगर संय्या छोडो मेरी ३:०६ (नागिन).
विस्मरण – लक्षात रहात नाही त्यांनी शिवरंजनी राग ऐकावा
१) मेरे नयना सावन भादों ….५:०६ (मेहबूबा)
२) ओ मेरे सनम….५:०९ (संगम)
३) दिल के झरोखे मे तुझको बिठाकर ….४:४१ (ब्रह्मचारी)
४) जाने कहा गये वो दिन ….६:५३ (मेरा नाम जोकर)
मानसिक ताण, अस्वस्थता – ज्यांना मानसिक ताण भरपूर प्रमाणात असेल त्यांनी राग बिहाग आणि राग मधुवंती वर आधारित गाणी ऐकावीत
१) पिया बावरी….४:०२ (खूबसूरत)
२) मेरे सूर और तेरे गीत ….३:११ (गूँज उठी शहनाई)
३) मतवारी नार ठुमक ठुमक चली ….६:२९ (आम्रपाली)
४) तेरे प्यार मे दिलदार ….४:०४ (मेरे मेहबूब)
क्रमशः…
गाण्यांची निवड – संग्राहक – श्री अरूण कुलकर्णी
पुणे
मो 8805984880
≈संपादक – श्री हेमन्त बावनकर/सम्पादक मंडळ (मराठी) – श्रीमती उज्ज्वला केळकर/श्री सुहास रघुनाथ पंडित /सौ. मंजुषा मुळे/सौ. गौरी गाडेकर≈