सौ अंजली दिलीप गोखले
इंद्रधनुष्य
☆ पोत नात्यांचा… ☆ प्रस्तुती – सौ अंजली दिलीप गोखले ☆
आई ही कॉटनच्या साडीसारखी असते. शेवटपर्यंत तिच्या स्पर्शातून फक्त मायाच पाझरत राहते.खूप तणावाच्या किंवा आनंदाच्या प्रसंगी आईच्या मांडीवर डोकं ठेऊन झोपण्याच सुखं अनुभवणं हा एक शब्दातीत अनुभव असतो.
बायको ही सिंथेटिक साडीसारखी असते. आकर्षक रंग आणि टिकाऊपणा हे तिचे गुणधर्म. कोणत्याही प्रसंगात ती टिकून राहते, निभावून जाऊ शकते. पण संशयाच्या अगर उपेक्षेच्या ठिणगीने पटकन पेट घेते.
प्रेयसी ही गर्भरेशमी साडीसारखी असते. सर्वांच्याच नशिबात असते असे नाही. तिच्या भावनांचा,मनाचा रेशीमपोत केवळ नजरेलासुद्धा जाणवतो,सुखावतो. मनाच्या तळाशी जपून ठेवावासा वाटतो.
मुलगी अथवा बहीण ही भरतकाम केलेल्या साडीसारखी असते. सासर आणि माहेरच्या धाग्यांना कुशलतेने एकत्र आणून एक सुंदरसे डिझाईन तयार करते. तिला सगळेच धागे जपावे लागतात, कारण कोणतेही धागे तुटले तरी सगळ्याच भरतकामाची शान जाते. सासरची नाती जपता जपता ती माहेरच्या अंगणात रमत राहते.
मैत्रीण ही एखाद्या उबदार शालीसारखी असते.आपल्या मैत्रीचं पांघरूण घालून तुम्हाला जपत राहते, निष्पाप मनानं, कोणतीही अपेक्षा न ठेवता ! ती आहे ही जाणीवच आधार देणारी असते. न उच्चारलेले शब्द ऐकून जी हवा असलेला भावनिक, मानसिक आधार देऊ शकते ती खरी मैत्रीण !!
संग्राहिका : सौ अंजली दिलीप गोखले
मोबाईल नंबर 8482939011
≈संपादक – श्री हेमन्त बावनकर/सम्पादक मंडळ (मराठी) – सौ. उज्ज्वला केळकर/श्री सुहास रघुनाथ पंडित /सौ. मंजुषा मुळे/सौ. गौरी गाडेकर≈