डाॅ. निशिकांत श्रोत्री
अल्प परिचय
वैद्यकी व्यवसाय, पुणे.
कथा, कादंबरी, एकांकिका, काव्य,अशा सर्वप्रकारच्या साहित्य प्रकारातील व वैद्यकीय लेखन. सुमारे पन्नास पुस्तके प्रकाशित. शिवाय ध्वनिफिती /सी.डीं। चे ही प्रकाशन झाले आहे.
आकाशवाणी व दूरदर्शनचे मान्ताप्राप्त भावगीतकार व अभिनेता.
इंद्रधनुष्य
☆ मंत्र पुष्पांजली — मराठी भावानुवाद ☆ डाॅ. निशिकांत श्रोत्री ☆
— संस्कृत श्लोक —
ॐ यज्ञेन यज्ञमयजन्त देवास्तनि धर्माणि प्रथमान्यासन् ।
ते ह नाकं महिमान: सचंत यत्र पूर्वे साध्या: संति देवा: ॥
ॐ राजाधिराजाय प्रसह्य साहिने।
नमो वयं वैश्रवणाय कुर्महे।
स मस कामान् काम कामाय मह्यं।
कामेश्र्वरो वैश्रवणो ददातु कुबेराय वैश्रवणाय।
महाराजाय नम: ॥
ॐ स्वस्ति, साम्राज्यं भौज्यं स्वाराज्यं
वैराज्यं पारमेष्ट्यं राज्यं महाराज्यमाधिपत्यमयं ।
समन्तपर्यायीस्यात् सार्वभौमः सार्वायुषः आन्तादापरार्धात् ।
पृथीव्यै समुद्रपर्यंताया एकराळ इति ॥
ॐ तदप्येषः श्लोकोभिगीतो।
मरुतः परिवेष्टारो मरुतस्यावसन् गृहे।
आविक्षितस्य कामप्रेर्विश्वेदेवाः सभासद इति ॥
॥ मंत्रपुष्पांजली समर्पयामि ॥
— मराठी भावानुवाद —
यूट्यूब लिंक >> मंत्रपुष्पांजली मराठी / Mantrapushpanjali Marathi – YouTube
ॐ यज्ञासहित करुन आद्य विधी उपासनेचे
पूजन केले देवे यागरूपी त्या प्रजापतीचे
यज्ञाचरणे देवताधामा केले त्यांनी प्राप्त
याची कर्मे महानता झाली त्यांना अर्जित
अनुकूल सकला असे तुझे कर्म
मनीच्या कामनांची पूर्ती तुझा धर्म
अमुच्या इच्छा समस्त पूर्ण करा
नमन राजाधिराजा वैश्रवणा कुबेरा
कल्याणकारक असावे राज्य
भोग्य परिपूर्ण असे साम्राज्य
लोभमोहविरहित लोकराज्य
अधिपत्य अमुचे असो महाराज्य
क्षितीजसीमेपर्यंत अमुचे राज्य सुखरूप असो
सागरमर्यादेचे अमुचे राज्य दीर्घ आयुचे असो
राज्य आमुचे सृष्टी आहे तोवर संरक्षित असो
आयु या राज्याची परार्ध वर्षे सुरक्षित असो
असे राज्य कीर्तीमानसे व्हावे
म्हणोनी या श्लोकास आम्ही गावे
अविक्षीत पुत्रांनी मरुद्गणांनी
परिवेष्टिले राज्य आम्हासि लाभो—-
भावानुवादकर्ता— ©️ डॉ. निशिकान्त श्रोत्री
९८९०११७७५४
या मराठी मंत्रपुष्पांजलीचे गायन-पठण पुढील लिंकवर टॅप केल्यास ऐकता येईल. आरतीनंतर संस्कृत मंत्रपुष्पांजलीनंतर. ही मराठी मंत्रपुष्पांजली लावावी आणि जमले तर म्हणावी.
https://youtu.be/1Sx5OFugEHQ
धन्यवाद आदरणीय। यूट्यूब लिंक लेख के साथ जोड़ दिया गया है।