सौ. विद्या पराडकर
इंद्रधनुष्य
☆ शिक्षकाची कदर…अल्बर्ट फर्नांडिस ☆ प्रस्तुती – सौ. विद्या पराडकर ☆
अल्बर्ट फर्नांडिस यांनी त्यांच्या एका पुस्तकात लिहिलं आहे—-
- रोममध्ये एकदा पोलिसांनी मला दंड केला. कामात असल्यानं मला वेळेवर दंड भरता आला नाही. त्यामुळेकोर्टात जावं लागलं. न्यायाधीशासमोर उभं केल्यावर त्यांनी कारण विचारल्यावर मी म्हटलं,” प्रोफेसर आहे, कामात एवढा गुंतलो की वेळच मिळाला नाही.”
माझं बोलणं पूर्ण व्हायच्या आत न्यायाधीश म्हणाले,
- अ टीचर इज इन द कोर्ट …!
लगेचच सगळे लोक उठून उभे राहिले आणि त्यांनी माझी माफी मागितली व माझा दंडही रद्द केला गेला.
त्या देशाच्या यशाचं रहस्य तेव्हा मला कळलं.
- ज्यांना अतिविशिष्ट किंवा व्हीआयपी म्हणतात ते कोण असतात ?
- अमेरिकेत केवळ दोन प्रकारच्या लोकांना अतिविशिष्ट मानलं गेलं आहे. वैज्ञानिक आणि शिक्षक.
- फ्रान्सच्या न्यायालयांमधे केवळ शिक्षकांनाच खुर्चीवर बसायचा अधिकार आहे.
- जपानमध्ये सरकारकडून परवानगी मिळाल्यावरच पोलीस एखाद्या शिक्षकाला अटक करू शकतात.
- कोरियात प्रत्येक शिक्षकाला ते सगळे अधिकार आहेत जे भारताच्या मंत्र्याला मिळतात– तेही केवळ आपलं ओळखपत्र दाखवून.
- अमेरिकन आणि युरोपीय देशांमध्ये प्राथमिक शिक्षकाला सर्वाधिक वेतन मिळतं, कारण तेच कच्च्या भांड्यांना आकार देतात.
- ज्या समाजात शिक्षकांचा अपमान होतो, तिथं फक्त चोर, आणि भ्रष्टाचारी लोकच तयार होतात.
सर्व शिक्षकांना समर्पित.
लेखक – अल्बर्ट फर्नांडिस
संग्राहिका – सौ. विद्या पराडकर
वारजे पुणे..
≈संपादक – श्री हेमन्त बावनकर/सम्पादक मंडळ (मराठी) – सौ. उज्ज्वला केळकर/श्री सुहास रघुनाथ पंडित /सौ. मंजुषा मुळे/सौ. गौरी गाडेकर≈