इंद्रधनुष्य
☆ शास्त्रीय सत्य… ☆ संग्रहिका – सुश्री आनंदी केळकर ☆
१. बायका पंचेंद्रियांचा वापर करताना डावा आणि उजवा या दोन्ही मेंदूंचा वापर एकाच वेळी करतात. पुरुष फक्त डावा मेंदू वापरतात. त्यामुळे एकाच वेळेस अनेकविध काम करण्याची क्षमता पुरुषांपेक्षा बायकांकडे जास्त आहे.
२. पूर्वीच्या काळी बायका घर संभाळणे, मुले, संकटांपासून संरक्षण अशी अनेक कामे एकाच वेळेस करायच्या. त्यामुळे उत्क्रांतीच्या टप्प्यात त्यांची peripheral vision तयार झाली. कारण सगळीकडे एकाच वेळी लक्ष द्यायचे असल्याने त्यांच्या डोळ्यातील बुब्बुळे जलद हालचाल करतात . पुरूषांच्या तुलनेत बायकांची बुब्बुळेआकाराने लहान आणि डोळ्यांतील पांढरा भाग मोठा असतो. त्यामुळे पुरुषांच्या तुलनेत बायकांची नजर जास्तीत जास्त गोष्टी झटक्यात निरीक्षित करते. याउलट पुरुषांनी पूर्वी शिकारीचे काम केले आहे. त्यामुळे त्यांची tunnel vision तयार झाली. त्यांच्या बूब्बुळ्ळांची वेगाने हालचाल होत नाही. बायकांच्या तुलनेत हं ! driving साठी अशी tunnel vision चांगली. तर जबाबदारीच्या किंवा मोठ्या कामांकरता बायकी नजर चांगली.
३. बायकांच्या शरीरात अँक्सिटोसिनचे प्रमाण पुरुषांपेक्षा जास्त असते. त्यामुळे पुरुषांपेक्षा त्यांचे स्पर्शज्ञान चांगले असते.
४. पुरुषांचा मेंदू विश्रांती घेतो तेव्हा मेंदूचे 70% कार्य बंद असते. बायकांच्या मेंदूने विश्रांती घेतली तरी 90% कार्य सुरू असते. बोला आता, कोणाचा मेंदू किती active आहे ! दरवर्षी परीक्षांमध्ये बाजी मारणाऱ्या मुलींचे इथे उदाहरण देते. ……..
अजून काय सांगू ? गांधीजींनी म्हटले आहे, ‘ सत्याग्रहाच्या काळात पुरुषांपेक्षा जास्त सहनशक्ती स्त्रियांच्यात दिसून आली आहे.‘ — “रंग आणि नक्षीकाम यापलिकडेही आम्ही बरेच काही आहोत !!!! “
संग्राहिका : आनंदी केळकर
≈संपादक – श्री हेमन्त बावनकर/सम्पादक मंडळ (मराठी) – सौ. उज्ज्वला केळकर/श्री सुहास रघुनाथ पंडित /सौ. मंजुषा मुळे/सौ. गौरी गाडेकर≈