वाचताना वेचलेले
☆ मोठे व्हाल तसतसे अधिक बोला… ☆ प्रस्तुती – श्री सुनीत मुळे☆
तुम्ही वयानं जसजसे मोठे व्हाल तसतसे अधिक बोला— असे डॉक्टर्स म्हणताहेत..
ज्येष्ठ नागरिकांनी अधिक बोलले पाहिजे कारण स्मरणशक्ती कमी होण्यापासून रोखण्याचा कोणताही इतर मार्ग नाही. अधिक बोलणे हा त्यातल्यात्यात प्रभावी मार्ग आहे.
ज्येष्ठ नागरिकांनी अधिक बोलण्याचे किमान तीन फायदे आहेत—-
१) बोलण्याने मेंदू सक्रिय होतो आणि सक्रिय राहतो, कारण भाषा आणि विचार एकमेकांशी संवाद साधतात, विशेषत: पटकन बोलत असताना, ज्यामुळे नैसर्गिकरित्या विचारांचे प्रतिबिंब जलद होते आणि स्मरणशक्ती देखील वाढते. जे ज्येष्ठ नागरिक अबोल असतात, कमी बोलतात, त्यांची स्मरणशक्ती कमी होण्याची शक्यता जास्त असते.
२) बोलल्याने मनावरचा बराचसा ताण दूर होऊ शकतो, मानसिक आजार टळू शकतात. आपण बरेचदा काही बोलत नाही, पण आपल्या मनात मात्र असतं. अश्यानं आपला भावनिक कोंडमारा होऊ शकतो आणि आपण गुदमरतो. कुणी वयस्कर व्यक्ती बोलत असेल तर बोलू द्या..
३) बोलण्याने चेहऱ्याच्या स्नायूंना व्यायाम होतो, घशाचाही व्यायाम होतो आणि फुफ्फुसाची क्षमता देखील वाढते. तसेच डोळे आणि कान खराब होण्याचा धोका, चक्कर वगैरे येण्यासारखे सुप्त धोकेही कमी होतात.
थोडक्यात, ज्येष्ठ नागरिक – सेवानिवृत्त व्यक्तींना अल्झायमरसारख्या विकारांपासून स्वतःचा बचाव करण्याचा एक उत्तम मार्ग म्हणजे बोलणे – शक्य तितके बोलणे, इतरांशी संवाद साधणे.
म्हणून, आपण सारे अधिक बोलूया आणि इतर ज्येष्ठांनाही नातेवाईक अन मित्रमंडळीसोबत अधिक बोलण्यास प्रवृत्त करूया…
संग्राहक : सुनीत मुळे