इंद्रधनुष्य
☆ “घट्ट नात्याचं घर…” ☆ प्रस्तुती – सुश्री वीणा छापखाने ☆
फोटो कोणी काढला माहीत नाही . पण हा सुंदर फोटो खूप काही सांगुन जाणारा आहे.
— फोटो काळा पांढरा आहे . पण या घरातील सुख समाधान व एकजुटीचे सारे रंग दाखवणारा आहे.
— यात कोणी तरी प्रतिकात्मक आबा आहे. त्याने डोळे वटारले की घर शांत.
— कोणी तात्या आहे, जो चार चार बैलांचा औत जुंपायचा.
— कोणी बापू आहे, जो दोन दोन भाकरी वरण्याच्या आमटीत कुस्करून खायचा.
— कोणी शांताक्का आहे. .पन्नास पोळ्या पटापटा लाटायची.
— कोणी बनाकाकू आहे, जी चटणी घरात कांडायची.
— कोणी कुसुम आहे जी उभ्या आडव्या २१ ठिपक्याची रांगोळी काढायची.
— एक छोट्या आहे. हरणी गाय आहे.
— घर साधं आहे. पण नात्याच्या एकोप्याचा पाया भक्कम आहे.
आपली, आपल्या आजोबा – पणजोबांची घरं अशीच होती . आता पोरांना काका माहित नाही. आत्या माहित नाही. ज्या घरात नणंद नाही, दीर नाही, खोकणारा सासरा नाही , गुडघे दुखतात म्हणून कण्हणारी सासू नाही, – अशा घराला नववधूची पसंती आहे.
— त्यामुळे अशी भरलेली घरं आता दिसणारच नाहीत. आणि असा सर्वांचा एकत्र फोटोही शक्य नाही..खरंच गेले ते दिवस — राहिल्या त्या आठवणी.
संग्राहिका : सुश्री वीणा छापखाने
≈संपादक – श्री हेमन्त बावनकर/सम्पादक मंडळ (मराठी) – सौ. उज्ज्वला केळकर/श्री सुहास रघुनाथ पंडित /सौ. मंजुषा मुळे/सौ. गौरी गाडेकर≈