श्री सुहास रघुनाथ पंडित
इंद्रधनुष्य
☆ “सरणारे वर्ष मी” – कविवर्य मंगेश पाडगावकर ☆ प्रस्तुती – श्री सुहास रघुनाथ पंडित ☆
मी उद्या असणार नाही,
असेल कोणी दूसरे !
मित्रहो सदैव राहो,
चेहरे तुमचे हासरे
झाले असेल चांगले,
किंवा काही वाईटही !
मी माझे काम केले,
नेहमीच असतो राईट मी
माना अथवा नका मानु,
तुमची माझी नाळ आहे !
भले होओ, बुरे होओ,
मी फक्त “काळ” आहे
उपकारही नका मानु,
आणि दोषही देऊ नका !
निरोप माझा घेताना,
गेट पर्यन्त ही येऊ नका
उगवत्याला “नमस्कार”,
हीच रीत येथली !
विसरु नका “एक वर्ष”,
साथ होती आपली
धुंद असेल जग उद्या,
नव वर्षाच्या स्वागताला !
तुम्ही मला खुशाल विसरा,
दोष माझा प्राक्तनाला
शिव्या, शाप, लोभ, माया,
यातले नको काही !
मी माझे काम केले,
बाकी दूसरे काही नाही
निघताना “पुन्हा भेटु”,
असे मी म्हणनार नाही !
“वचन” हे कसे देऊ,
जे मी पाळणार नाही
मी कोण ?
सांगतो..
“शुभ आशिष” देऊ द्या,
“सरणारे वर्ष” मी,
आता मला जाऊ द्या !!
— कविवर्य मंगेश पाडगावकर
संग्राहक : सुहास रघुनाथ पंडित
≈संपादक – श्री हेमन्त बावनकर/सम्पादक मंडळ (मराठी) – सौ. उज्ज्वला केळकर/श्री सुहास रघुनाथ पंडित /सौ. मंजुषा मुळे/सौ. गौरी गाडेकर≈