श्री शामसुंदर महादेवराव धोपटे
इंद्रधनुष्य
☆ रैवन पक्षी… लेखक – अज्ञात ☆ प्रस्तुती – श्री शामसुंदर महादेवराव धोपटे ☆
एक पक्षी गरुडाला चोच मारण्याचा प्रयत्न करतो, तो म्हणजे रैवन पक्षी..
हा गरुडाच्या पाठीवर बसून मानेवर / गळ्यावर आपल्या चोचीने प्रहार करत असतो. परंतु गरुड ह्याच्या क्रियेला एकदाही प्रत्युत्तर देत नाही की, रैवन बरोबर झटापटी देखील करत नाही, म्हणजेच गरुड रैवनच्या कृतीकडे पूर्णतः दुर्लक्ष करीत असतो. गरुड स्वतःचा वेळ आणि ऊर्जा रैवन बरोबरच्या लढाईत वाया घालवत नाही. गरुड स्वतःचे पंख उघडून हवेत उंच उंच उडत राहतो. गरुड जसजसे उंच जातो तसतसे रैवनला श्वास घेण्यास त्रास होतो आणि शेवटी ऑक्सिजनच्या कमतरतेमुळे रैवन स्वतःहून खाली पडतो.
म्हणूनच कधीकधी सर्वच लढायांना उत्तर देण्याची गरज नाही. लोकांचे युक्तिवाद, फालतूचे प्रश्न किंवा त्यांनी केलेल्या टीकेवर उत्तर देण्याची काही एक गरज नाही.
मित्रहो.,
आपली प्रतिमा उंचवा.
समाज उपयोगी काम करीत राहा.
समोरचे स्वतःहून खाली पडतील…
संग्राहक : श्यामसुंदर धोपटे
≈संपादक – श्री हेमन्त बावनकर/सम्पादक मंडळ (मराठी) – सौ. उज्ज्वला केळकर/श्री सुहास रघुनाथ पंडित /सौ. मंजुषा मुळे/सौ. गौरी गाडेकर≈