डाॅ. निशिकांत श्रोत्री
इंद्रधनुष्य
☆ गीत ऋग्वेद – मण्डल १ – सूक्त २२ – ऋचा ११ ते १४ ☆ डाॅ. निशिकांत श्रोत्री ☆
ऋग्वेद – मण्डल १ – सूक्त २२ ऋचा ११ ते १४
आज मी आपल्यासाठी मेधातिथि कण्व या ऋषींनी रचलेल्या ऋग्वेदाच्या पहिल्या मंडळातील बाविसाव्या सूक्तातील अकरा ते चौदा या ऋचा आणि त्यांचे मराठी गीत रुपांतर सादर करीत आहे.
यातील अकराव्या ऋचेत देवीला तर बाराव्या ऋचेत इंद्राणीला आवाहन केलेले आहे; तेरावी आणि चौदावी या दोन ऋचा द्यावापृथिवी देवतांना आवाहन करतात.
मराठी भावानुवाद :
अ॒भि नः॑ दे॒वीरव॑सा म॒हः शर्म॑णा नृ॒पत्नीः॑ । अच्छि॑न्नपत्राः सचन्ताम् ॥ ११ ॥
वीरपत्नी या येऊनी देवी प्रसन्न होऊ द्या
कृपा करूनी सौख्यानंदाचे आम्हा वरदान द्या
त्यांच्या प्रसन्नतेच्या मार्गी काही विघ्न नसावे
त्यांनी आम्हा समृद्धीचे आशीर्वच हो द्यावे ||११||
इ॒हेन्द्रा॒णीमुप॑ ह्वये वरुणा॒नीं स्व॒स्तये॑ । अ॒ग्नायीं॒ सोम॑पीतये ॥ १२ ॥
मंगल कल्याणास्तव अमुच्या आवाहन करितो
अग्नायी वरुणानी इंद्राणीना पाचारितो
शुभसुखदायी देवींनो या यज्ञयागी यावे
सोमरसाच्या स्वीकाराने आम्ही कृतार्थ व्हावे ||१२||
म॒ही द्यौः पृ॑थि॒वी च॑ न इ॒मं य॒ज्ञं मि॑मिक्षताम् । पि॒पृ॒तां नो॒ भरी॑मभिः ॥ १३ ॥
पृथ्वी माते द्यावादेवी आई महिदेवते
सुखसमृद्धी यज्ञावरती भरभरुनी येऊ दे
उत्कर्ष उत्तुंग होऊनी आम्ही दंग रहावे
स्वप्न अमुचे कधीही तुम्ही भंग होउ ना द्यावे ||१३||
तयो॒रिद्धृ॒तव॒त्पयो॒ विप्रा॑ रिहन्ति धी॒तिभिः॑ । ग॒न्ध॒र्वस्य॑ ध्रु॒वे प॒दे ॥ १४ ॥
सदैव अपुल्या स्त्रोत्रांमध्ये गाती विद्वान
अक्षयलोकी गंधर्वांच्या स्तविती कवनांतुन
घृतपरिपूर्ण क्षीराची ते अति प्रशंसा करिती
आशीर्वादाने त्यांच्या ऋत्विजा लाभे तृप्ती ||१४||
(या ऋचांचा व्हिडीओ गीतरुपात युट्युबवर उपलब्ध आहे. या व्हिडीओची लिंक येथे देत आहे. हा व्हिडीओ ऐकावा, लाईक करावा आणि सर्वदूर प्रसारित करावा. कृपया माझ्या या चॅनलला सबस्क्राईब करावे.)
Attachments area
Preview YouTube video Rugved Mandal 1 Sukta 22 Rucha 11 – 14
Rugved Mandal 1 Sukta 22 Rucha 11 – 14
© डॉ. निशिकान्त श्रोत्री
मो ९८९०११७७५४
≈संपादक – श्री हेमन्त बावनकर/सम्पादक मंडळ (मराठी) – सौ. उज्ज्वला केळकर/श्री सुहास रघुनाथ पंडित /सौ. मंजुषा मुळे/सौ. गौरी गाडेकर≈