श्री जितेंद्र जाधव
इंद्रधनुष्य
☆ “कशाला द्यायचे आपण १५० कोटी रुपये ?”… लेखक – श्री सतीश खाडे ☆ प्रस्तुती – श्री सुनीत मुळे ☆
“ कशाला द्यायचे आपण १५० कोटी रुपये रशियाला ? आपण पाच कोटी रुपयात तेजस (LCA ) वेपन सिस्टिम बनवू शकतो !”
भारताला त्यावेळी संरक्षण व्यवस्थेसाठी तेजस वेपन सिस्टिम घायची होती. जगात त्यावेळी मोजक्याच देशात ती बनवली जात होती. त्या दिवशी रशियाचे शिष्टमंडळ भारतात होते. दुसऱ्या दिवशी, भारत व रशिया यांच्यात खरेदी विषयी करार होणार होता. वेपन सिस्टिम अँड मिसाईल ईंटेग्रेशनची किंमत ₹ १५० कोटी सांगितली होती. उद्या करार होणार म्हणून पंतप्रधानाचे तत्कालीन प्रमुख सल्लागार डॉक्टर कलाम साहेबांनी भारतातील त्या संबंधित प्रमुख लोकांची बैठक घ्यायला सांगून मतं कळवायला सांगितले होते.
त्या बैठकीत तेजस वेपन सिस्टिम विषयी सर्व माहिती ऐकल्यावर एक शास्त्रज्ञ उभा राहिला ….त्याने आत्मविश्वासपूर्वक सांगितले की “ कशाला द्यायचे १५० कोटी रुपये? ह्याच गुणवत्तेची वेपन सिस्टिम मी व माझा विभाग पाच कोटी रुपयात बनवून देऊ.” – सगळी सभा स्तब्ध झाली !!
ही चर्चा डॉक्टर कलाम सरांना कळवली गेली. त्यांनी या शास्त्रज्ञाला तातडीने भेटायला बोलावले. हा शास्त्रज्ञ त्यांना जाऊन भेटला आणि त्याने सर्व शंकांचे निरसन केले. डॉक्टर कोटा हरिनारायणा ( LCA -तेजस प्रोग्रॅम डायरेक्टर ) यांनाही त्या सर्व तंत्रज्ञान व नियोजनावर विश्वास बसला. ते म्हणाले, “ तू लाग कामाला.”.. …दुसऱ्या दिवशी करार होणार होता तो चक्क रद्द करण्यात आला. भारतभरातील सर्व संबंधितांच्या भुवया उंचावल्या गेल्या. रशियन शिष्टमंडळाला तर मोठा धक्का होता.
पुढे दोन ते तीन वर्षातच या शास्त्रज्ञाने शब्द दिल्याप्रमाणे वेपन सिस्टिम बनवली आणि मिसाईल चाचणी तेजस Aircraft वरून यशस्वी केली. त्याबद्दल त्या शास्त्रज्ञाला ‘DRDO Scientist of the year’ हा पुरस्कारही मिळाला.
तेजस fighter ने आतापर्यन्त २००० हून अधिक weapon release चाचण्या यशस्वी करून नवीन विश्वविक्रम केला आहे.– नंतर त्या शास्त्रज्ञाची २०१६ मध्ये नॅशनल ऐरोस्पेस लॅबोरेटरी (NAL )येथे डायरेक्टर म्हणून नियुक्ती झाली. त्याने धडाडीने ७ वर्ष थांबलेला १४ सीटर सारस पॅसेंजर aircraft प्रोजेक्ट revive करून, दोन वर्षात तो ट्रॅक वर आणून विमानाने जानेवारी २०१८ मध्ये पहिले उड्डाण केले. सरकारने आता NAL ला १९ सीटर रिजनल ट्रान्सपोर्ट aircraft डेव्हलपमेंट ची मंजुरी दिली आहे. हे विमान २०२३ मध्ये उड्डाण घेईल.
आणि आता तर आणखी कमाल केली त्याने…. जगातील सर्वात कमी किमतीचा, तंत्रज्ञानात कोणतीही उंची कमी नसलेला हंसा ट्रेनर aircraft बनवलाय फक्त एक कोटी रुपयात !! ….. गेल्याच आठवड्यात त्याचेही राष्ट्रार्पण झाले आहे ……..
तो शास्त्रज्ञ आहे ‘प्रवरा इंजिनीयरिंग कॉलेजच्या पहिल्या बॅचचा विद्यार्थी आमचा लाडका मित्र “जितेंद्र जाधव” !!
मित्रा तुझा खूप खूप अभिमान वाटतो!!! देशाला व जगाला अभिमान वाटावा इतके उत्तुंग यश तू संपादन केले आहेस. त्रिवार नाही हजारदा अभिनंदन !!!
— श्री सतीश खाडे
प्रेसिडेंट, माजी विद्यार्थी संघ, प्रवरा इंजिनिअरिंग कॉलेज
संग्राहक : श्री सुनीत मुळे
≈संपादक – श्री हेमन्त बावनकर/सम्पादक मंडळ (मराठी) – सौ. उज्ज्वला केळकर/श्री सुहास रघुनाथ पंडित /सौ. मंजुषा मुळे/सौ. गौरी गाडेकर≈