सुश्री शोभना आगाशे
इंद्रधनुष्य
☆ चांगदेव पासष्ठी – भाग-8… ☆भावानुवाद- सुश्री शोभना आगाशे ☆
परमात्मवस्तु स्वानंदरूप
स्वयंस्फूर्त अन् प्रकाशरूप॥३६॥
पुत्र तू वटेश्वराचा असशी
परमात्म्याचा अंश असशी
कर्पुराच्या कणी कर्पुरगुण
आत्म्याठायी परमात्मगुण
साधर्म्य तुझ्या माझ्यातले
ऐक सांगतो तुज पहिले॥३७॥
दोघे आहो परमात्म्याचे अंश
माझ्या उपदेशी तुझा सारांश
जणु आपुल्या एका हातासि
मिठी पडे दुसर्या हाताची॥३८॥
शब्दे ऐकावा शब्द जसा
स्वादे चाखावा स्वाद जसा
उजेडे पहावा आपुला उजेड जसा
मी उपदेश तुवा करावा तसा॥३९॥
सोन्याचा मुलामा सोन्यावर देण्या
मुखाचाच आरसा मुख पाहण्या
तैसा आपुला संवाद शब्दहीन
आत्मा आत्म्यात विलीन॥४०॥
© सुश्री शोभना आगाशे
सांगली
दूरभाष क्र. ९८५०२२८६५८
≈संपादक – श्री हेमन्त बावनकर/सम्पादक मंडळ (मराठी) – सौ. उज्ज्वला केळकर/श्री सुहास रघुनाथ पंडित /सौ. मंजुषा मुळे/सौ. गौरी गाडेकर≈