डाॅ. निशिकांत श्रोत्री
इंद्रधनुष्य
☆ श्रीमद्भगवद्गीता — अध्याय तिसरा— कर्मयोग— (श्लोक ३१ ते ४०) – मराठी भावानुवाद ☆ डाॅ. निशिकांत श्रोत्री ☆
☆
ये मे मतमिदं नित्यमनुतिष्ठन्ति मानवाः ।
श्रद्धावन्तोऽनसूयन्तो मुच्यन्ते तेऽपि कर्मभिः ॥ ३१ ॥
☆
चित्ती श्रद्धा निर्दोष दृष्टी मम मताचे अनुपालन
मुक्त होती ते जीवनातल्या समस्त कर्मापासून ॥३१॥
☆
ये त्वेतदभ्यसूयन्तो नानुतिष्ठन्ति मे मतम् ।
सर्वज्ञानविमूढांस्तान्विद्धि नष्टानचेतसः ॥ ३२ ॥
☆
जे न मानिती मतास मम या देती दोष सदैव मला
विरुद्ध माझ्या आचरण त्यांचे श्रेष्ठ मानुनी स्वतःला
मूढ तयांसी घेई जणुनी अज्ञानी ते असती खास
मोहापोटी पदरात त्यांच्या केवळ असतो रे ऱ्हास ॥३२॥
☆
सदृशं चेष्टते स्वस्याः प्रकृतेर्ज्ञानवानपि ।
प्रकृतिं यान्ति भूतानि निग्रहः किं करिष्यति ॥ ३३ ॥
☆
नियमानुसार सृष्टीच्या करिती समस्त भूत कर्म
सृष्टीविपरित कर्मनिग्रहास्तव काय फुकाचे वर्म ॥३३॥
☆
इन्द्रियस्येन्द्रियस्यार्थे रागद्वेषौ व्यवस्थितौ ।
तयोर्न वशमागच्छेत्तौ ह्यस्य परिपन्थिनौ ॥ ३४ ॥
☆
इंद्रियासक्ती मधुनी सुप्त राग-द्वेष असूर
कल्याणाच्या मार्गामधील रिपू असती घोर
तयासि कधिही वश ना व्हावे निरासक्त राहून
दूर ठेवुनी त्या दोघांना प्राप्त करी कल्याण ॥३४॥
☆
श्रेयान्स्वधर्मो विगुणः परधर्मात्स्वनुष्ठितात् ।
निधनं श्रेयः परधर्मो भयावहः ॥ ३५ ॥
☆
आचरण मनोभावे परधर्माचे नाही श्रेयस्कर
आचरण गुणात अभाव जरी स्वधर्म श्रेयस्कर
मृत्यू आला जरी स्वधर्माचरणे तोही श्रेयस्कर
भयदायी धर्म परि परक्याचा न कदापि श्रेयस्कर ॥३५॥
☆
अर्जुन उवाच
अथ केन प्रयुक्तोऽयं पापं चरति पूरुषः ।
अनिच्छन्नपि वार्ष्णेय बलादिव नियोजितः ॥ ३६ ॥
☆
कथात अर्जुन
अशी काय प्रेरणा आहे कथन करी मोहना
मनात नसता इच्छा करितो मनुष्य पापाचरणा ॥३६॥
☆
श्रीभगवानुवाच
काम एष क्रोध एष रजोगुणसमुद्भवः ।
महाशनो महापाप्मा विद्ध्येनमिह वैरिणम् ॥ ३७ ॥
☆
कथित श्रीभगवान
रजोगुणा पासुनी उद्भवले काम-क्रोध विकार
अति भोगानेही अतृप्त राहतो कामाचा विचार
महत्पापी हा घोर वैरी प्रेरितसे करण्या पाप
आहारी कामाच्या न जाता जीवन हो निष्पाप ॥३७॥
☆
धूमेनाव्रियते वह्निर्यथादर्शो मलेन च ।
षयथोल्बेनावृतो गर्भस्तथा तेनेदमावृतम् ॥ ३८ ॥
☆
धूम्र झाकतो अग्नीला धूळ दर्पणास
वार आच्छादी गर्भाला काम झाकी ज्ञानास ॥३८॥
☆
आवृतं ज्ञानमेतेन ज्ञानिनो नित्यवैरिणा ।
कामरूपेण कौन्तेय दुष्पूरेणानलेन च ॥ ३९ ॥
☆
काम जणू अनल जयास नाही कधिही अंत
विद्वानांच्या ज्ञानाला झाकोळणारा कामही अनंत ॥३९॥
☆
इन्द्रियाणि मनो बुद्धिरस्याधिष्ठानमुच्यते ।
एतैर्विमोहयत्येष ज्ञानमावृत्य देहिनम् ॥ ४० ॥
☆
गात्रे मानस अन् प्रज्ञा कामाचे अधिष्ठान
काम मोहवी जीवात्म्यास त्यांना झाकोळून ॥४०॥
☆
– क्रमशः भाग तिसरा
अनुवादक : © डॉ. निशिकान्त श्रोत्री
एम.डी., डी.जी.ओ.
मो ९८९०११७७५४
≈संपादक – श्री हेमन्त बावनकर/सम्पादक मंडळ (मराठी) – सौ. उज्ज्वला केळकर/श्री सुहास रघुनाथ पंडित /सौ. मंजुषा मुळे/सौ. गौरी गाडेकर≈