इंद्रधनुष्य
☆ श्री रामजन्मभूमी प्रकरणातील काही महत्वाच्या बाबी. – लेखक : श्री नितीन पालकर ☆ प्रस्तुती – श्री सुनीत मुळे ☆
श्री रामजन्मभूमी प्रकरणातील काही महत्वाच्या बाबी.
- एक दगडी खांब (एडवर्ड पिलर).
- एक अपूर्ण नकाशा.
- एक प्राचीन ग्रंथ (स्कंद पुराण).
- आणि एक दैवी योगायोग.
१९०२, अयोध्या
फक्त ‘एडवर्ड’ नावाचा ब्रिटीश अधिकारी स्कंद पुराणावर आधारित अयोध्येतील सर्व १४८ तीर्थस्थानांचे सर्वेक्षण करतो. प्रत्येक तीर्थ स्थानामध्ये क्रमांकासह दगडी पाट्या (स्तंभ) उभारून तो त्याच्या संरक्षणाची सूचना देतो.
“हे खांब कोणी हटवल्यास 3000 रुपये दंड आणि 3 वर्षांचा तुरुंगवास अशी शिक्षा दिली जाईल.”
११७ वर्षांनंतर हे स्तंभ भारताच्या इतिहासात महत्त्वाची भूमिका बजावतील याची कोणाला कल्पनाही नव्हती.
२००५, लखनौ
वकील पी.एन.मिश्रा हे स्वामी अविमुक्तेश्वरानंद यांच्यासोबत लखनौहून कलकत्त्याला कारने जात होते. ते रस्ता चुकतात आणि अयोध्येला पोहोचतात.
अयोध्येत, त्यांना एका साधू भेटतो आणि संभाषणाच्या दरम्यान, ते अयोध्येत किती तीर्थस्थळे आहेत हे विचारतात.
साधू उत्तर देतात – अयोध्येत १४८ तीर्थस्थळे आहेत.
पी.एन.मिश्रा साधूला विचारतात की त्यांना अचूक संख्या कशी माहित आहे. साधू त्यांना सांगतो की १९०२ मध्ये एडवर्ड नावाच्या एका ब्रिटिशाने या सर्व १४८ ठिकाणी खांब उभारले होते. मग साधू पुढे सांगतात की १९८० मध्ये हंस बकर नावाचा इतिहासकार अयोध्येत कसा आला, त्याने सर्वेक्षण केले, शहराबद्दल एक पुस्तक लिहिले आणि अयोध्येचे ५ नकाशे तयार केले.
आश्चर्यचकित झालेले पी.एन.मिश्रा त्यांना एडवर्डने उभारलेले ते दगडी पाट्या (स्तंभ) दाखवायला सांगतात. तिथे त्यांना एक मनोरंजक ‘स्टोनबोर्ड’ दिसला –
Pillar #100.
Pillar #100 हा गणपतीच्या मूर्तीसह ८ फूट खोल विहिरीत होता .
स्तंभ पाहिल्यानंतर पी.एन.मिश्रा कलकत्त्याला रवाना झाले.
२०१९, भारताचे सर्वोच्च न्यायालय
रामजन्मभूमी खटल्याची कार्यवाही सुरू आहे. भगवान रामाच्या जन्माचे नेमके स्थान सिद्ध करण्यासाठी हिंदूंना अडचण येत आहे.
बाबरी मशिदीच्या खाली १२व्या शतकातील मंदिर असल्याचे The Archaeological Survey of India (ASI) भारतीय पुरातत्व सर्वेक्षण (ASI) च्या अहवालात सिद्ध झाले, परंतु ते भगवान राम यांचे नेमके जन्मस्थान असल्याचे सिद्ध करण्यात अहवाल अपयशी ठरला.
भारताच्या सरन्यायाधीशांनी विचारले, “रामाच्या जन्माचे नेमके स्थान सिद्ध करण्यासाठी तुमच्याकडे काही पुरावे आहेत का?”.
पी.एन.मिश्रा, जे ‘संत समाजा’चे वकील आहेत त्यांनी उत्तर दिले “होय, स्कंद पुराणात तसे पुरावे उपलब्ध आहेत.”
स्कंद पुराण हा प्राचीन हिंदू धर्मग्रंथ आहे. हा प्राचीन दस्तऐवज आहे ज्यामध्ये हिंदू तीर्थक्षेत्रांच्या सर्व महत्त्वाच्या ठिकाणांची माहिती आहे. येथे सर्व हिंदू तीर्थ स्थानांची भौगोलिक स्थाने आहेत.
भगवान रामाच्या जन्मस्थानाचे नेमके स्थान वैष्णव खंड / अयोध्या महात्म्यामध्ये नमूद केले आहे.
त्यात म्हटले आहे “सरयू नदीच्या पश्चिमेस विघ्नेश्वर आहे, या स्थानाच्या ईशान्येस भगवान रामाचे जन्मस्थान आहे – ते विघ्नेश्वराच्या पूर्वेस, वसिष्ठाच्या उत्तरेस व लौमासाच्या पश्चिमेस आहे”
सरन्यायाधीश म्हणाले, “स्कंद पुराणात वापरलेली भाषा आम्हाला समजू शकत नाही. आम्हाला समजू शकेल असा काही नकाशा तुमच्याकडे आहे का?
पी.एन.मिश्रा: “होय. इतिहासकार हंस बकर यांचे एक पुस्तक आहे ज्यामध्ये नकाशे आहेत जे एडवर्ड स्टोनबोर्ड्स (स्तंभ) च्या आधारे तयार केले गेले होते, जे स्कंद पुराणाच्या आधारावर बन ले गेले होते.
सरन्यायाधीशांनी पी.एन.मिश्रा यांना ताबडतोब नकाशासह पुस्तक जमा करण्यास सांगितले.
या नव्या पुराव्यामुळे कोर्टात खळबळ उडाली.
- स्कंद पुराणममध्ये जन्मस्थानाच्या अचूक स्थानाचा उल्लेख आहे.
- एडवर्डने स्कंद पुराणाच्या आधारे १४८ दगडी पाट्या उभारल्या.
- हंस बेकरने त्या १४८Stone Bords (दगडी पाट्यां)च्या आधारे नकाशा तयार केला.
त्यामुळे हे दोन्ही पूर्ण परस्परसंबंधी होते… पण एक अडचण होती…
स्कंद पुराणात भगवान रामाचे नेमके जन्मस्थान विघ्नेशच्या ईशान्येला आहे हे लिहिले आहे, परंतु हंस बेकरने जो नकाशा तयार केला होता त्यावर फार स्पष्टपणे चिन्हांकित केलेले नाही. त्यामुळे त्या नकाशावरून भगवान रामाच्या जन्मस्थानाचे स्थान तंतोतंत जुळत नव्हते.
आणि मग या खटल्यातील स्टार साक्षीदार – शंकराचार्य अविमुक्तेश्वरानंद यांसाग प्रवेश झाला.
पी.एन.मिश्रा यांनी शंकराचार्यांना बोलावून हे गूढ उकलण्यास सांगितले.
शंकराचार्यांनी अयोध्येला भेट देऊन हे गूढ उकलले.
शंकराचार्य अविमुक्तेश्वरानंद हे साक्षीदार क्रमांक वादीचा साक्षीदार २०/०२ (Defense Witness 20/02) होते. स्कंदपुराणममध्ये नमूद केलेले ‘विघ्नेश’ हे हंस बकर यांच्या नकाशात दाखवलेले विघ्नेश्वर मंदिर नाही, अशी माहिती त्यांनी सर्वोच्च न्यायालयाला दिली.
त्याऐवजी, विघ्नेश हा स्तंभ क्रमांक १०० आहे जेथे विहिरीच्या आत गणेशाची मूर्ती (ज्याला विघ्नेश असेही म्हणतात) आहे.
जेव्हा आपण स्तंभ #१०० विघ्नेश म्हणून घेतो तेव्हा गूढ उकलले जाते.
स्तंभ #१०० ची ईशान्य तीच जागा आहे जिथे हिंदूंचा दावा आहे की भगवान राम यांचा जन्म झाला; आणि ते स्थान इतर सर्व ओळख निकषांना/खुणांना देखील पूर्ण करते.
न्यायमूर्ती चंद्रचूड हसले आणि म्हणाले, “या लोकांनी राम जन्माचे अचूक स्थान सिद्ध केले आहे.”
अविमुक्तेश्वरानंद यांच्या साक्षीने केस बदलली आणि मुस्लिमांना लक्षात आले ते केस हरले आहेत. त्यांची केस वाचवण्याचा एकमेव मार्ग म्हणजे शंकराचार्यांची साक्ष चुकीची असल्याचे सिद्ध करणे.
मुस्लिमांच्या वकिलांनी शंकराचार्यांची उलटतपासणी घेण्याची परवानगी मागितली.
मुस्लिमांचे १५ वकील पुढील १० दिवस अविमुक्तेश्वरानंद यांची उलटतपासणी घेत होते. शंकराचार्यांनी त्यांच्या सर्व प्रश्नांची अचूक आणि चोख उत्तरे दिली. पाचही न्यायाधीश त्यांचे म्हणणे लक्षपूर्वक ऐकत होते.
१० दिवसांनंतर, मुस्लिमांच्या वकिलांनी प्रतिवाद संपवला.
अशा प्रकारे, स्कंद पुराण, एडवर्डचे स्टोनबोर्ड (पिलर्स), हंस बेकर नकाशा आणि स्वामी अविमुक्तेश्वरानंद यांच्या साक्षीच्या आधारे सर्वोच्च न्यायालयाने हिंदूंच्या बाजूने निकाल दिला!
के.के. मुहम्मद यांच्या ASI अहवालामुळेच आपल्याला राम मंदिर मिळाले असे बहुसंख्य हिंदूंना वाटते. The Archaeological Survey of India (एएसआय) च्या अहवालाने महत्त्वाची भूमिका बजावली असली तरी या प्रकरणातील निर्णायक टप्पा, प्राचीन ग्रंथ – स्कंद पुराण आणि आपले धार्मिक गुरु, ज्यांनी या ग्रंथांचा अभ्यास केला आणि त्यातील सत्याची उकल केली.
सर्वोच्च न्यायालयाच्या निकालात ‘स्कंद पुराण’ हे नाव ७७ वेळा आले आहे.
२००९ पर्यंत हिंदू न्यायालयात खटला हरत होते. त्यानंतर शंकराचार्यांनी २००९ मध्ये वकील पी.एन.मिश्रा यांची नियुक्ती केली.
पी.एन.मिश्रा म्हणाले की, जर ते २००५ मध्ये रस्ता चुकले नसते आणि जर तो साधू भेटला नसता, तर ते कोर्टात भगवान रामाचे जन्मस्थान कदाचित सिद्ध करू शकले नसते.
मला खात्री आहे की हा एक दैवी योगायोग होता.
जय श्री राम !!!
आधार :
हंस बेकर (जन्म 1948) हे एक सांस्कृतिक इतिहासकार आणि भारतशास्त्रज्ञ आहेत, ज्यांनी ग्रोनिंगेन विद्यापीठात हिंदू धर्माच्या इतिहासाचे प्राध्यापक म्हणून काम केले आहे. त्यांनी ब्रिटिश म्युझियममध्ये “Beyond Boundries: Religion, Region, Language and the State” या प्रकल्पात संशोधक म्हणूनही काम केले आहे.
लेखक : श्री नितीन पालकर
प्रस्तुती : श्री सुनीत मुळे
≈संपादक – श्री हेमन्त बावनकर/सम्पादक मंडळ (मराठी) – श्रीमती उज्ज्वला केळकर/श्री सुहास रघुनाथ पंडित /सौ. मंजुषा मुळे/सौ. गौरी गाडेकर≈