इंद्रधनुष्य
☆ माघार कोणी घ्यावी ? ☆ संग्राहक – श्री विनय माधव गोखले ☆
माघार कोणी घ्यावी ?
दोघांमध्ये भांडण ? माघार कोणी घ्यावी ? स्वामी विवेकानंद यांचे उत्तर—–
“दोघांमध्ये भांडण झाले तर माघार घ्यायची कुणी ? —
ज्याचे विचार बरोबर असतात त्याने माघार घ्यावी, की ज्याचे विचार चुकीचे आहेत, त्याने माघार घ्यावी? “
स्वामी विवेकानंदाना असा प्रश्न विचारण्यात आला……
स्वामी विवेकानंद म्हणाले –” चूक कोण,बरोबर कोण याला अजिबात महत्व नाही….,
ज्याला सुखी रहायचे आहे, आनंदी राहायचे आहे, त्याने या भांडणातून माघार घ्यावी….”
—–“स्वार्थ आणि मोठेपणा ” सोडला की, आनंद घेता येतो आणि देताही येतो…
अपेक्षा, गैरसमज, अहंकार, तुलना, यामुळे एकमेकातील नाती बिघडू शकतात…
असे होऊ नये म्हणून—–
” विसरा अन् माफ करा ” हे तत्त्व केव्हाही चांगलं …
“ग्रंथ” समजल्याशिवाय “संत” समजणार नाही…आणि “संत” समजल्याशिवाय ”भगवंत”समजणार नाही.हेच सत्य आहे.
संग्राहक : श्री विनय माधव गोखले
भ्रमणध्वनी – 09890028667
≈संपादक–श्री हेमन्त बावनकर/सम्पादक मंडळ (मराठी) – श्रीमती उज्ज्वला केळकर/श्री सुहास रघुनाथ पंडित /सौ. मंजुषा मुळे ≈