सुश्री सुलु साबणेजोशी
इंद्रधनुष्य
☆ “स्वा. सावरकर रचित श्री गणेश प्रार्थना” ☆ प्रस्तुती – सुश्री सुलू साबणे जोशी ☆
☆
हे सदया गणया तार, तुझ्यावरी भार
तू मायबाप आधार ॥ धृ ॥
*
किती देशशत्रू भूतली
हृच्छत्रु सहाही परी
शापें वा सुशरे जाळी
तो ब्राम्हण आता खाई परक्या लाथांचा बा मार ॥१॥
*
देशावर हल्ला आला
पुरुष तो लढोनी मेला
स्त्री गिळी अग्नीकाष्ठाला
रजपूत्त परी त्या परवशतेचे भूत पछाडी, तार ॥२॥
*
अटकेला झेंडा नेला
रिपु कटका फटका दिधला
दिल्लीचा स्वामी झाला
तो शूर मराठा, पाही तयाचे,
खाई न कुत्रे हाल ॥३॥
☆
संग्राहिका : सुश्री सुलू साबणे जोशी
मो – 9421053591
≈संपादक – श्री हेमन्त बावनकर/सम्पादक मंडळ (मराठी) – सौ. उज्ज्वला केळकर/श्री सुहास रघुनाथ पंडित /सौ. मंजुषा मुळे/सौ. गौरी गाडेकर≈