श्री सदानंद आंबेकर
घरटं
श्री सदानंद आंबेकर जी की हिन्दी एवं मराठी साहित्य लेखन में विशेष अभिरुचि है। गायत्री तीर्थ शांतिकुंज, हरिद्वार के निर्मल गंगा जन अभियान के अंतर्गत गंगा स्वच्छता जन-जागरण हेतु गंगा तट पर 2013 से निरंतर प्रवास।
कल आपने श्री सुजित कदम जी का मराठी आलेख – * घराचे घरपण * पढ़ा। आखिर चिड़िया का घोंसला भी तो घर ही है?
इसी क्रम में हम श्री सदानंद आंबेकर जी के आभारी हैं इस मराठी लघुकथा – “घरटं ” के लिए जो कि उनके जीवन के ही एक प्रसंग से प्रेरित है। )
शहरातील प्रसिद्ध समाजसेवक, अनेक धर्मार्थ संस्थांचे प्रमुख आणि नामवंत बिल्डर, डॉ प्रताप आपल्या बालकनी मधे त्यांच्या धर्मपत्नी सह बसून सकाळच्या चहा चा आनन्द घेत होते। देशकाळाची चर्चा होत असतांना अचानक प्रताप चे लक्ष बालकनी मधे ठेवलेल्या उंची लाकडी रॅक कडे गेले, त्यात सर्वात वरच्या कप्यावर दोन सुरेख लहानगे पक्षी येर-झार करीत होते। लक्ष देऊन पाहिले तर कळले कि ते वारंवार येत-जात, वाळके गवत, कापूस, पंख इत्यादि वस्तु आणून तिथे आपले एक घरटं बनवून राहिले आहेत। बायकोला ती गोष्ट दाखविली तर तिच्या तोंडून सहजपणे निघाले – ‘अय्या, किती सुंदर घरटं बनवून राहिले आहेत ते, कित्ती मज्जा येईल जेव्हां लहान-लहान पिले चीव-चीव करतील ते . . . .’
हे ऐकतांच प्रतापराव लगेच बोलले- ‘हे कसलं सुंदर, यानी तर घरांत कचरांच व्हायचा आणि कसलं ते चीव-चीव म्हणे, उगांच नसला तो कल्ला व्हायचा। छे छे, हा त्रास आत्ताच लांब करायला हवा। तू नोकराला सांग कि ही घाण आत्ताच्या आत्ता इथून फेक।’
यावर त्यांच्या सौ उत्तरल्या – ‘अहो, यांत काय नुकसान होतंय आपलं ? न ते बिचारे तुम्हांला सीमेंट-वाळू मागतांत न तंर तुमच्या प्लॉट चा हक्कं, मग त्यात कसंला त्रास तो? अहो, तुम्हीं पण तर शहराभरांत कुठेहि इमारती उभ्या करता नां, मग या बिचारयांना कां म्हणून हाकलावे? त्या शिवाय तुम्हीं तर गोर-गरीबांना मदतीचे कामं पण करता नं?’
बायकोचे उत्तर ऐकून लगेच उठून प्रतावरावांनी लांब दंडा हातांत घेतला नि त्या चिमुकल्या पक्ष्यांचं ते घरटं उधळलं आणि बायको कडे पहांत बोलले- ‘अगं तू पण एकदम भाबडीच, आपल्या या बंगल्याची ब्यूटी खराब व्हायची आणि या घरट्याने आपल्याला काय तरी प्रॉफिट मिळणार??’
प्रतापरावांची पत्नी त्यांच्या कडे न समजणार्या नजरेनी नुसती बघत राहून गेली।
© सदानंद आंबेकर
छान
आपले आभार।