सौ.वंदना अशोक हुळबत्ते
कलास्वाद
☆ भेंडाच्या कलाकृती ☆ सौ.वंदना अशोक हुळबत्ते ☆
आपण घरी बरेच मसाल्याचे पदार्थ वापरत असतो.प्रत्येक पदार्थांचा आकार,रंग ,वास,चव वेगळी असते.ते नेहमी मला खुणावत असतात त्यांच्या आकारात नेहमी मला वेगळे आकार दिसतात.
मसाल्याच्या पदार्थांचा वापर करून मी चित्रे, रांगोळ्या काढल्या आहेत.
एकदा घरात मंगल कार्य होत खुप वेलदोडे सोलले होते खुप साली निघालेल्या,त्या फेकून देणे मला पटेना.या सालीचा वापर करून काही तरी केले पाहिजे असे वाटू लागले म्हणून त्या साली मी वेगळ्या ठेवून दिल्या.मला प्रत्येक सालीत एक पाकळी दिसत होती.साली गोलाकार चिटकवून काही फुले तयार केली.त्यांने भेटकार्ट सजवली.दोन सालीना कात्रीने आकार दिला तर यातून छान पिसे तयार झाली. खुप पिसे तयार केली.पेपरवर वेलदोड्याच्या सालीतून एका चिमणी ने आकार घेतला.याच पध्दतीने एक मोर तयार झाला.सालींना आकार देणे जरा जिकिरीचे होते पण तयार झालेली कलाकृती पाहून श्रम विसरून गेले.कलेची दृष्टी विकसित झाली की कश्यात ही आकार दिसतो हेच खरे.
© सौ.वंदना अशोक हुळबत्ते
सांगली
≈संपादक–श्री हेमन्त बावनकर/सम्पादक मंडळ (मराठी) – श्रीमती उज्ज्वला केळकर/श्री सुहास रघुनाथ पंडित /सौ. मंजुषा मुळे ≈