मराठी साहित्य – कविता / गीत ? निरोप (विरहगीत) ? श्यामला(ज्योत्स्ना)जोशी

श्यामला (ज्योत्स्ना) जोशी

? निरोप (विरहगीत) ?

(प्रसिद्ध मराठी गीतकार, संगीतकार एवं गायिका श्यामला(ज्योत्स्ना)जोशी जी का विरह वेदना पर आधारित  यह गीत, एक  भावप्रवण एवं अनुपम उदाहरण है।  

 

सोडूनी तू जातांना मजला

सांग मी राहू कशी ?

दूर दूर जातांना तुजला

सांग मी पाहू कशी..? //धृ//

 

भोगलेल्या त्या सुखांना

सांग मी विसरू कशी ?

ओघळणार्या आसवांना

सांग मी अडवू कशी..? //१//

 

पोळलेल्या भावनांना

सांग मी विजवू कशी ?

रंगविलेल्या त्या स्वप्नांना

सांग मी पुसू कशी..? //२//

 

या हृदयाच्या यातनांना

सांग मी दावू कशी ?

प्रेम सागर अमर अपुला

सांग बांध घालू कशी..? //३//

 

तू दिलेल्या त्या गीताला

सांग सूर लावू कशी ?

कंठ माझा दाटून आला

सांग मी गाऊ कशी..? //४//

 

संशयी नज़रा त्या लोकांच्या

सांग मी टाळू कशी ?

अडखळली पाऊले ही

सांग मी जाऊ कशी..? //५//

 

निरोप देतांना विरह वेदना

सांग मी लपवू कशी ?

तूच माझा जीवनसाथी

सांग मी पटवू कशी..? //६//

 

®©- *श्यामला(ज्योत्स्ना)जोशी. पुणे*

*गीतकार-संगीतकार-गायिका*

मो.नं
9823250197
7378327402