श्री अमोल अनंत केळकर

( युवा मराठी साहित्यकार श्री अमोल अनंत केळकर जी मराठी व्यंग्य  विधा (विडंबन)  के सशक्त हस्ताक्षर हैं। मैं समझता हूँ इस विधा में अभिरुचि केअतिरिक्त  एम बी ए  (मार्केटिंग)  शैक्षणिक योग्यता निःसंदेह पृष्ठभूमि में कार्य करती ही है। श्री अमोल अनंत केळकर जी के ही शब्दों में  उनका परिचय – “सध्या राहणार बेलापूर नवी मुंबई. ठाण्याजवळ  स्टील कंपनीत नोकरीला. प्रासंगिक लेखन/ विडंबन / चारोळ्या ललित लेखन. ‘माझे टुकार ई-चार ‘ ( www.poetrymazi.blogspot.in)  आणि ‘ देवा तुझ्या द्वारी आलो’ ( www.kelkaramol.blogspot.in) हे दोन ब्लाॅग. यावर नियमीत लेखन. जोतिष शास्त्राची आवड”।  आपका लेखन नितांत सहज  एवं धाराप्रवाह है। आज प्रस्तुत है उनकी विशिष्ट विडंबन रचना “हा ‘ टॅग ‘ गाडीला लावीतसे “जो कि मराठी गीत  “हा छंद जिवाला लावि पिसे !” पर आधारित है। )

 ☆ हा ‘ टॅग ‘ गाडीला लावीतसे ☆ 

(मुळ  गाणे : हा छंद जिवाला लावि पिसे !)

 

तिथे टोल सखे भरपूर दिसे

खिशात ‘ मनी ‘ सर ले भलते

दिनरात तुझा रे ध्यास जडे

हा ‘ टॅग ‘ गाडीला लावीतसे

 

ती रांग  तुझ्या नजरेमधली

गाडी आपली नेहमीच बळी

‘टॅगात ‘ असेल जादुखरी

गेलो ओलांडुनी  ‘फास्ट’ कसे

 

आरशाच्या मागे चिकटव वरी

हा स्कँन होतसे लईभारी

तो मार्ग मग घायाळ करी

वेगात पळाली कार दिसे

 

©  श्री अमोल अनंत केळकर

१३/०४/२०२०

नवी मुंबई, मो ९८१९८३०७७९

poetrymazi.blogspot.in

१८/१२/१९

 ☆ मुळ गाणे : हा छंद जिवाला लावि पिसे ! ☆ 

 

तुझे रूप सखे गुलजार असे

काहूर मनी उठले भलते

दिनरात तुझा ग ध्यास जडे

हा छंद जिवाला लावि पिसें!

 

ती वीज तुझ्या नजरेमधली

गालीं खुलते रंगेल खळी

ओठांत रसेली जादुगिरी

उरिं हसति गुलाबी गेंद कसे!

 

नखर्यांत तुझ्या ग मदनपरी

ही धून शराबी दर्दभरी

हा झोक तुझा घायाळ करी

कैफांत बुडाले भान असे!

 

☆ ☆ ☆ ☆ ☆ 
image_printPrint
5 1 vote
Article Rating

Please share your Post !

Shares
Subscribe
Notify of
guest

0 Comments
Oldest
Newest Most Voted
Inline Feedbacks
View all comments