(प्रसिद्ध मराठी कवि श्री अशोक श्रीपाद भांबुरे जी का e-abhivyakti में स्वागत है। प्रस्तुत है श्री अशोक जी की होली पर्व पर एक भावप्रवण कविता।)
रणांगणावर खेळत असतो जवान होळी
नकाच भाजू विरोधकांनो त्यावर पोळी
रंग नव्हे ते धमन्या मधले रक्त सांडती
युद्धाचे हे श्रेय लाटण्या कुणी भांडती
भांडण घरचे शेजाऱ्याला नका दाखवू
घरात घुसण्या नका कुणाला संधी देवू
वैऱ्याचे या उगा गोडवे नकाच गाऊ
वैरी शेवट वैरी असतो नसतो भाऊ
रोजच होळी खेळत असतो सीमेवरती
नाव शत्रूचे लिहून ठेवतो गोळीवरती
ईद दिवाळी आणिक होळी असते जेव्हा
तुझी आठवण जीव जाळते तेव्हा तेव्हा
शहीद झाले नमन तयांना कोटी कोटी
विसरत नाही ते तर असती कायम ओठी
© अशोक श्रीपाद भांबुरे
धनकवडी, पुणे ४११ ०४३.
मो. ८१८००४२५०६, ९८२२८८२०२८
Email: [email protected]