श्रीमति उर्मिला उद्धवराव इंगळे
(वरिष्ठ मराठी साहित्यकार श्रीमति उर्मिला उद्धवराव इंगळे जी का धार्मिक एवं आध्यात्मिक पृष्ठभूमि से संबंध रखने के कारण आपके साहित्य में धार्मिक एवं आध्यात्मिक संस्कारों की झलक देखने को मिलती है. इसके अतिरिक्त ग्राम्य परिवेश में रहते हुए पर्यावरण उनका एक महत्वपूर्ण अभिरुचि का विषय है। आज प्रस्तुत है श्रीमती उर्मिला जी की भावप्रवण रचना “बारा मोटांची विहीर”। उनकी मनोभावनाएं आने वाली पीढ़ियों के लिए अनुकरणीय है। ऐसे सामाजिक / धार्मिक /पारिवारिक साहित्य की रचना करने वाली श्रीमती उर्मिला जी की लेखनी को सादर नमन। )
☆ केल्याने होतं आहे रे # 39 ☆
लिंब गावच्या वेशीत !
बारा मोटांची विहीर !
साडे तीनशे वर्षांची !
शिल्प कलेत माहीर !!१!!
मुख्य विहीर देखणी !
अष्टकोनी आकाराची !
खोल शंभर फुटांची !
चोरवाट भुयाराची. !!२!!
मुख्य विहीरी नंतर !
एक पूल बांधलेला !
जाण्यासाठी तिच्याकडे !
अदभूत वास्तुकला !!३!
राज महाल चौखांबी !
दरवाजा भक्कमसा !
भुयारात राजवाडा !
नमुनाच अजबसा !!४!!
अठराशें कालखंड !
शाहूपत्नी विरुबाई !
खास निर्मिती करुनी !
फुलविली आमराई !!५!!
विरुबाई साताऱ्याच्या !
बायको शाहूराजांची !
आवडती बागायती !
बाग करावी आंब्यांची !!६!!
विरुबाईंच्या मनात !
आहे जमीन सुपीक !
झाडे लावावी आंब्यांची !
लिंब गाव ते नजिक !!७!!
स्वत:झाडे लावुनिया !
झाडे लावा जगवाना !
असा संदेश दिधला !
विरुबाईंनी सर्वांना !!८!!
भुयारात राजवाडा !
पुढे दोन चोर वाटा !
नंतर उपविहीर !
गोड्या पाण्याचा हो साठा !!९!!
उन्हाळ्यात हो गारवा!
हिवाळ्यात उबदार !
आजीवन पाणीझरा !
अजबच कारभार !!१०!!
येथे खाजगी बैठका !
होत होत्या पेशव्यांच्या !
शाहूराजां बरोबर!
साक्षी निवांत क्षणांच्या !!११!!
©️®️उर्मिला इंगळे
सातारा
दिनांक: २७-६-२०.
!!श्रीकृष्णार्पणमस्तु!!
खुपच छान!!!
सुंदर रचना