श्रीमति उर्मिला उद्धवराव इंगळे
(वरिष्ठ मराठी साहित्यकार श्रीमति उर्मिला उद्धवराव इंगळे जी का धार्मिक एवं आध्यात्मिक पृष्ठभूमि से संबंध रखने के कारण आपके साहित्य में धार्मिक एवं आध्यात्मिक संस्कारों की झलक देखने को मिलती है. इसके अतिरिक्त ग्राम्य परिवेश में रहते हुए पर्यावरण उनका एक महत्वपूर्ण अभिरुचि का विषय है। आज प्रस्तुत है श्रीमती उर्मिला जी स्वामी श्री समर्थ रामदास जी को समर्पित रचना “श्रीसमर्थांचे मनाचे श्लोक”। उनकी मनोभावनाएं आने वाली पीढ़ियों के लिए अनुकरणीय है। ऐसे सामाजिक / धार्मिक /पारिवारिक साहित्य की रचना करने वाली श्रीमती उर्मिला जी की लेखनी को सादर नमन। )
☆ केल्याने होतं आहे रे # 34 ☆
(काव्यरचना:-अष्टाक्षरी छंद )
चाफळक्षेत्री निवास
तेथे नित्य लाभतसे
श्रीरामाचा सहवास !!१!!
समर्थांनी लिहिलेला
सर्व वाङ्मय सागर
दासबोध सर्वश्रुत
वेद शास्त्रांचा आधार !!२!!
वाङ्मय सागरातील
श्र्लोक मनाचे सुंदर
समर्थांनी केले होते
जन्मोत्सवाला सादर !!३!!
श्रीक्षेत्र चाफळ येथे
मध्यरात्री कल्याणास
सांगितले समर्थांनी
त्वरे लिहून घेण्यास !!४!!
प्रती करुनिया त्यांच्या
केल्या वाटप शिष्यांना
जाऊनीया घरोघरी
म्हणा मोठ्याने तयांना!!५!!
खणखणीत आवाज
ऐकुनिया बाया येती
धान्य भिक्षा घेऊनिया
सुपासुपाने वाढती !!६!!
प्रभावाने भारलेले
श्र्लोक मनाचे ऐकुनी
मरगळलेले जन
उभे राहिले ऊठुनी !!७!!
शक्ती संचार तयांना
झाला समर्थ कृपेने
झुंजावयाला शत्रूसी
धावू लागले त्वरेने !!८!!
मारुतीच्या मंदीरात
खणखणीत आवाज
येई मनाच्या श्लोकांचा
रोज होता तिन्हीसांज !!९!!
श्र्लोक दोनशें पाच तें
केली रचना तयांची
जो ईश सर्व गुणांचा
केली सुरुवात सांची !!१०!!
जयजय रघुवीर
असा घोष तो करुनी
सांगितले भिक्षा मागा
असे समर्थे करुनी !!११!!
!!जयजय रघुवीर समर्थ!!
©️®️उर्मिला इंगळे
सातारा
दिनांक:-८-५-२०
!!श्रीकृष्णार्पणमस्तु!!