श्री अशोक श्रीपाद भांबुरे
(वरिष्ठ मराठी साहित्यकार श्री अशोक श्रीपाद भांबुरे जी का अपना एक काव्य संसार है । आप मराठी एवं हिन्दी दोनों भाषाओं की विभिन्न साहित्यिक विधाओं के सशक्त हस्ताक्षर हैं। आज प्रस्तुत है आपकी एक समसामयिक कविता “कोरोना”।)
☆ कोरोना ☆
चार हात दूर होता
माझ्या पासून कोरोना
घाबरलो होतो मीही
मला म्हणाला डरो ना
धाडसाने विचारले
आला कशाला इकडं
काय करणार आहे
तू रे आमचं वाकडं
खाद्य खेळणी चीनची
असतात जीवघेणी
मरताय थोडे थोडे
लक्ष देता का रे कोणी
मीही तिथली उपज
टाकायला आलो फासे
मला पाहून कशाला
घाबरता तुम्ही असे
आलो आहे शिकवाया
स्वच्छतेचा परिपाठ
नका घाबरून जाऊ
फक्त रहा धष्टपुष्ट
अपघात जुलाबाने
रोज मरतात लोक
माझ्या एकट्याचा नाही
येथे तुम्हाला रे धाक