श्री कपिल साहेबराव इंदवे
(युवा एवं उत्कृष्ठ कथाकार, कवि, लेखक श्री कपिल साहेबराव इंदवे जी का एक अपना अलग स्थान है. आपका एक काव्य संग्रह प्रकाशनधीन है. एक युवा लेखक के रुप में आप विविध सामाजिक कार्यक्रमों में भाग लेने के अतिरिक्त समय समय पर सामाजिक समस्याओं पर भी अपने स्वतंत्र मत रखने से पीछे नहीं हटतेआज प्रस्तुत है उनकी एक विचारणीय एवं प्रेरक कविता ज्योती म्हणजेच क्रांती।
☆ ज्योती म्हणजेच क्रांती☆
अखंड क्रांतीची ज्योत पेटवली
धाडसाने आद्य क्रांतिकारका
विचारांच्या तेजाने उजळवली
धरती सवे असंख्य तारका
तू जन्मला सत्य शोधण्यासाठी
माता बघिणींच्या शिक्षणासाठी
जाहलास ज्ञानाची अखंड गंगा
लढला असप्रुश्यता घालवण्यासाठी
शिक्षणाची देवता तूच ज्योती
धन्य तुझ्या अंगणातली ती हौद जाहली
महाराष्ट्रासवे ही भारत माता
नमन करून तुज महात्मा म्हटली
किती वंदावे तुज महात्मा
मानव धर्माचा पुरस्कर्ता
न्याय दिधला विधवा कूमारी
अनाथ बालकांचा पालनकर्ता
© कपिल साहेबराव इंदवे
मा. मोहीदा त श ता. शहादा, जि. नंदुरबार, मो 9168471113