श्री अशोक श्रीपाद भांबुरे
(वरिष्ठ मराठी साहित्यकार श्री अशोक श्रीपाद भांबुरे जी का अपना एक काव्य संसार है । आप मराठी एवं हिन्दी दोनों भाषाओं की विभिन्न साहित्यिक विधाओं के सशक्त हस्ताक्षर हैं। आज प्रस्तुत है एक भावप्रवण कविता “दीनानाथा”।)
☆ दीनानाथा ☆
नाही झाली भेट तुझी
नाही वाचली मी गीता
माय बापाच्या चरणी
फक्त ठेवला मी माथा
तेथे भेट तुझी झाली
गाली हसला तू होता
माझ्या हाताला लागली
जणू तुकयाची गाथा
नाही व्हायचे वाल्मिकी
राम नाम गाता गाता
होवो श्रावणा सारखी
माझ्या आयुष्याची कथा
माझ्या भाग्याची थोरवी
कीर्ति आई यश पिता
हात त्यांचे डोईवरी
काय मागू दीनानाथा
माया मोहाची पायरी
नको घराला रे दाता
लालसेचा घडा मनी
त्याला घाततो पालथा
© अशोक श्रीपाद भांबुरे
धनकवडी, पुणे ४११ ०४३.
मो. ८१८००४२५०६, ९८२२८८२०२८
अच्छी रचना