मराठी साहित्य – कविता ☆ मुका होता. . !☆ – कविराज विजय यशवंत सातपुते

कविराज विजय यशवंत सातपुते

 

(आज प्रस्तुत है कविराज विजय यशवंत सातपुते जी  की एक भावप्रवण कविता  मुका होता. . !)

 

☆ मुका होता. . ! ☆

 

मुका रसिक म्हणूनी

कुणी हिणवले त्याला

भाषा शब्दांची बोलत

मुका होता,  कवी झाला. . . !

 

वाचा गेली अपघाती

बोलणारा मूक झाला

त्याच्या मुक्या वेदनेचा

कवितेत जन्म झाला. . . . !

 

मुकेपणा लेणे त्याचे

काव्यविश्व साकारते

एका एका शब्दातून

मायबोली  आकारते. . . . !

 

मुक्याचीच मायबोली

लेखणीत सामावली

त्याच्या काळजाची भाषा

आसवात पाणावली.. . . . !

 

 

✒  © विजय यशवंत सातपुते

यशश्री, 100 ब दीपलक्ष्मी सोसायटी,  सहकारनगर नंबर दोन, पुणे 411 009.

मोबाईल  9371319798.