श्री अशोक श्रीपाद भांबुरे
(वरिष्ठ मराठी साहित्यकार श्री अशोक श्रीपाद भांबुरे जी का अपना एक काव्य संसार है । आप मराठी एवं हिन्दी दोनों भाषाओं की विभिन्न साहित्यिक विधाओं के सशक्त हस्ताक्षर हैं। आज प्रस्तुत है विश्व कविता दिवस पर आपकी एक विशेष कविता “श्वास मोकळा ”।)
☆ श्वास मोकळा ☆
(जागतिक कविता दिनाच्या सर्व कवी, कवयित्री व कवितांचा आस्वाद घेणाऱ्या रसिकांना मनापासून शुभेच्छा!)
रस्त्याने या जरी घेतला श्वास मोकळा
मला वाटले रस्ता झाला आज पांगळा
सुन्याच बागा मैदानावर नाही गर्दी
हुशार काळा आळसावून बसलाय फळा
शस्त्राविन हे युद्ध लादले या जगतावर
रक्तपात ना मरतो आहे देह सापळा
मित्र जमेना संचारावर आली बंदी
आवरला मग साऱ्यांनी हा मोह आंधळा
सार्क देश हे मिळून करतील इथे सामना
नका करू रे तुम्ही पराचा उगा कावळा
बर्गर पिझ्झा खाणे आता बंदच केले
आंबट-चिंबट चाखत आहे संत्र आवळा
तुझ्या सारखे कितीतरी रे आले गेले
युद्ध जिंकुनी पुन्हा एकदा करू सोहळा
© अशोक श्रीपाद भांबुरे
धनकवडी, पुणे ४११ ०४३.
मो. ८१८००४२५०६, ९८२२८८२०२८