कविराज विजय यशवंत सातपुते
☆ विजय साहित्य – एक चंद्र ☆ कविराज विजय यशवंत सातपुते ☆
(अष्टाक्षरी)
एक एक पान गेले
मागे डहाळी ठेवून
जीवनाच्या प्रवासात
आहे झाड ते टिकून. . . . !
चैत्र पालवीत गेला
कसा सरून वसंत
एकट्याने सांभाळला
जीव अनादी अनंत. . . . !
पिढ्या पिढ्या हेच घडे
जाते लेकरू सोडून
आठवांच्या पौर्णिमेला
जाते घरटे देऊन. . . . !
किती आले किती गेले
जीवनात हे उन्हाळे
फांदी फांदीने जपले
सुख दुःख पावसाळे . . . . !
एक चंद्र ॠतूरंगी
चैतन्याने फुलारतो
कवितेच्या रोमरोमी
अलगद विसावतो……!
एक चंद्र शरदाचा
मनी आशा जागवतो
तरू निष्पर्ण होताना
रोमरोमी फुलारतो. . . . !
© विजय यशवंत सातपुते
यशश्री, 100 ब दीपलक्ष्मी सोसायटी, सहकार नगर नंबर दोन, पुणे 411 009.
मोबाईल 9371319798
≈ ब्लॉग संपादक – श्री हेमन्त बावनकर/सम्पादक मंडळ (मराठी) – श्रीमती उज्ज्वला केळकर/श्री सुहास रघुनाथ पंडित ≈