कविराज विजय यशवंत सातपुते

? कवितेचा उत्सव # 135 – विजय साहित्य ?

☆ नाती जपूया… ! ☆ कविराज विजय यशवंत सातपुते ☆

आद्य गुरू मायबाप

स्थान त्यांचे अंतरात

नाती जपूया प्रेमाने

भावस्पर्शी काळजात …१

 

आज्जी आजोबा घराचे

सौख्य समृध्दी दालन

तत्त्वनिष्ठ संस्कारांचे

ध्येयवादी संकलन … २

 

काका, काकू, मामा,मामी

आत्या मावशीचा बोल

कधी धाक , कधी लाड

भावनांचा समतोल …३

 

मित्र मैत्रिणीचे नाते

काळजाचा गोतावळा

सुख दुःख समाधान

असे उरी कळवळा …४

 

नाते बंधु भगिनींचे

वैचारिक छत्रछाया

घास अडतसे ओठी

धावतसे प्रेममाया … ५

 

नाते सहजीवनाचे

लेणे सासर माहेर

नाती जपूया प्रेमाने

देऊ काळीज आहेर…६

© कविराज विजय यशवंत सातपुते

सहकारनगर नंबर दोन, दशभुजा गणपती रोड, पुणे.  411 009.

मोबाईल  8530234892/ 9371319798.

≈संपादक – श्री हेमन्त बावनकर/सम्पादक मंडळ (मराठी) – श्रीमती उज्ज्वला केळकर/श्री सुहास रघुनाथ पंडित /सौ. मंजुषा मुळे/सौ. गौरी गाडेकर≈

image_print
0 0 votes
Article Rating

Please share your Post !

Shares
Subscribe
Notify of
guest

0 Comments
Oldest
Newest Most Voted
Inline Feedbacks
View all comments