सुश्री मीनाक्षी सरदेसाई
(वरिष्ठ मराठी साहित्यकार सुश्री मीनाक्षी सरदेसाई जी मराठी साहित्य की विभिन्न विधाओं की सशक्त हस्ताक्षर हैं। कई पुरस्कारों/अलंकारों से पुरस्कृत/अलंकृत सुश्री मीनाक्षी सरदेसाई जी का जीवन परिचय उनके ही शब्दों में – “नियतकालिके, मासिके यामध्ये कथा, ललित, कविता, बालसाहित्य प्रकाशित. आकाशवाणीमध्ये कथाकथन, नभोनाट्ये , बालनाट्ये सादर. मराठी प्रकाशित साहित्य – कथा संग्रह — ५, ललित — ७, कादंबरी – २. बालसाहित्य – कथा संग्रह – १६, नाटिका – २, कादंबरी – ३, कविता संग्रह – २, अनुवाद- हिंदी चार पुस्तकांचे मराठी अनुवाद. पुरस्कार/सन्मान – राज्यपुरस्कारासह एकूण अकरा पुरस्कार.)
आज प्रस्तुत है वरिष्ठ कवी स्व ग ह पाटील जी की उत्कृष्ट कविता लेझीम पर आधारित आपकी एक विडंबन कविता – दिवस ‘सेल’चे हम भविष्य में भी आपकी सुन्दर रचनाओं की अपेक्षा करते हैं।
☆ लेझीम ☆
(जुने श्रेष्ठ, कवी कै. ग.ह. पाटील यांची उत्कृष्ट कविता.)
दिवस सुगीचे सुरू जाहले।
ओला चारा बैल माजले।
शेतकरी मन प्रसन्न झाले
खळखळ, छुमछुम,डुमडुम, पटडुम
लेझिम चाले जोरात ।।
☆ विडंबन कविता— दिवस ‘सेल’चे ☆
दिवस सेलचे सुरु जाहले ।
जिकडेतिकडे बोर्ड झळकले ।
बायांचे मन प्रसन्न झाले ।
पटकन, झटकन, भर्कन, सर्कन
विक्री होतसे जोरात ।।
न ऊ वाजता शटर उघडती
गाद्यागिरद्या स्वच्छ करती
सुंदर साड्या बाहेर टांगती
इकडून, तिकडून, नटून, थटून
सेल्स गर्ल्स येती झोकात ।।
नाश्ता, सैपाक, धुंदीत उर्कून
‘त्या’च्या कडुनी रक्कम उकळून
फोन वरुनी मैत्रीणी जमवून
भरभर,तरतर, लवकर, गरगर
फिरति सख्या बाजारात ।।
इथे ‘हकोबा ‘तिथे ‘बांधणी’
गर्भ रेशमी किंवा ‘चिकणी’
साड्यांची राणी हि पैठणी
सुळुसुळु,झुळुझुळु, हळूहळू, भुळभुळु
ढीग संपतो तासात ।।
विटकी,फाटकी कुठे कुठे
घरि आल्यानंतर कळते ।
कपाट जरि भरभरुन वाहते ।
भुलवी,झुलवी, खुळावतो हा
सेल अखेरी महागात ।।
© मीनाक्षी सरदेसाई
मोबाईल नंबर 9561582372
सुंदर रचना