कविराज विजय यशवंत सातपुते

? कवितेचा उत्सव # 141  – विजय साहित्य ?

☆ निरोपारती ☆ कविराज विजय यशवंत सातपुते ☆

गौरी सोबत, देव चाललें,

आता निजधामा

निरोपारती,स्विकारूनीया,

निरोप हा घ्यावा…|| धृ.||

 

उत्सव खासा, रजेमजेचा,

आहे वरदायी

परंपरेचा, कलागुणांचा,

 ठेवा फलदायी

स्वागत झाले, गणरायाचे,

मोद घरी न्यावा…|| १.||

 

लाडू मोदक, शमी केवडा,

ताजी दुर्वादले

भाव भक्तीचे, कलागुणांचे,

केले रे सोहळे

यथामतीने,यथाशक्तिने,

पुजार्चंन देवा…|| २.||

 

रोज नव्याने,तुझी आरती,

श्रद्धा हृदयांत

गौरी पूजन, भव्य सोहळा,

उत्सव रंगात

आरासशोभा,विद्युतमाळा,

नेत्री दडवावा… || ३.||

 

पंचपक्वान्ने,फळाफुलांनी,

भरली रे ओटी

गणेश गौरी,ध्यास घराला,

कीर्ती तुझी मोठी.

सरीता आली,तुला न्यायला,

यावे गणराया…|| ४.||

 

© कविराज विजय यशवंत सातपुते

सहकारनगर नंबर दोन, दशभुजा गणपती रोड, पुणे.  411 009.

मोबाईल  8530234892/ 9371319798.

≈संपादक – श्री हेमन्त बावनकर/सम्पादक मंडळ (मराठी) – सौ. उज्ज्वला केळकर/श्री सुहास रघुनाथ पंडित /सौ. मंजुषा मुळे/सौ. गौरी गाडेकर≈

image_print
0 0 votes
Article Rating

Please share your Post !

Shares
Subscribe
Notify of
guest

1 Comment
Oldest
Newest Most Voted
Inline Feedbacks
View all comments
Mayuressh Deshpande

खूप सुंदर विजय दादा. कविता खूप आवडली.