सौ. मिनल अविनाश कुडाळकर
(सौ. मिनल अविनाश कुडाळकरजी का ई-अभिव्यक्ति में हार्दिक स्वागत है । आप अपने कॉलेज के समय से ही साहित्य की विभिन्न विधाओं में रचनाएँ लिख रही हैं। आपका संक्षिप्त साहित्यिक परिचय आपके ही शब्दों में – “कॉलेज जीवना पासून लेखनाची आवड होती. फुलांवरच्या कविता. प्रसंगानुरूप लेखन करत आहे. सांगलीतील 81व्या साहित्य संमेलनामुळे पुन्हा लिहायला सुरुवात केलीआणि 2011ला लेक वाचवा या विषयावरील “मायेची ओंजळ” हा काव्य संग्रह प्रकाशित करण्यात आला. त्यावर विविध ठिकाणी कार्यक्रम करण्यात आले. समाज कार्यामुळेही लेखन करत आहे।” आज प्रस्तुत है आपकी कविता “विद्येचे बाळ”।)
☆ विद्येचे बाळ ☆
दिवा जळतो आहे
अनेक वाती बनून
ज्योत बनन्याच काम केलेस तू
स्त्री जातीच्या, अंधारमय प्रकाशाला
लख्ख प्रकाशित केलेस तु
कालबाह्य रीतिरिवाज
जाळतच राहिलीस तू
अन् उमेदीने जगण्यासाठी
नवशिक्षित केलस तू
बदलत्या काळानुसार स्त्रीत्वाला
सामोरे जाण्याचं धैर्य दिलंस तू
स्त्री हक्कासाठी लढताना
इतिहासकालीन स्त्रीत्व दाखवल तू
स्त्री- पुरुष समानता
ते एकमेकांसाठीच आहेत
हे पदोपदी सिद्ध केलंस तू
स्त्री जीवनाचं शल्य सांगताना
तिला जगण्यासाठी बद्ध केलंस तू
तुझ्या लखलखणाऱ्या ज्योतीने
कितीतरी वातींना तेजोमय केलंस तू
मिळून साऱ्याजणींना एकत्र केलंस तू
सावित्री बनलीस आणि इतिहास गाठलास तू
पुन्हा पुन्हा नव्याने तेवण्याची
जिद्द मात्र ठेवलीस तू
तुझ्या विद्येच्या स्त्री जातीच्या बाळाला
जन्म देण्यासाठी एकदा पुन्हा परत ये
पुन्हा एकदा परत ये….पुन्हा एकदा परत ये…..
© सौ. मिनल अविनाश कुडाळकर
सांगली