कविराज विजय यशवंत सातपुते
कवितेचा उत्सव # 152 – विजय साहित्य
☆ चालक तूं ☆ कविराज विजय यशवंत सातपुते ☆
दत्त दत्त कृपा निधी
वेद चारी तुझ्या पदी..
गोमाताही देवगणी
दत्तात्रेय नाम वदी..१
गुरुदेवा दिगंबरा
सत्व रज तम मूर्ती..
निजरुपे लीन होऊ
द्यावी चेतना नी स्फूर्ती..२
अनुसूया अत्रीऋषी
जन्म दाते त्रैमुर्तीचे..
ब्रम्हा विष्णू आणि हर
तेज आगळे मूर्तीचे..३
दत्त दत्त घेता नाम
भय चिंता जाई दूर
लय, स्थिती नी उत्पत्ती
कृपासिंधु येई पूर..४
अवधुता गुरू राया
तुझ्या दर्शना आलो मी..
काया वाचा पदी तुझ्या
आनंदात त्या न्हालो मी..५
हरी,हर नी ब्रम्हा तू
साक्षात्कारी पालक तू
ज्ञानमूर्ती पीडाहारी
संसाराचा चालक तू..६
© कविराज विजय यशवंत सातपुते
मोबाईल 8530234892/ 9371319798.
≈संपादक – श्री हेमन्त बावनकर/सम्पादक मंडळ (मराठी) – सौ. उज्ज्वला केळकर/श्री सुहास रघुनाथ पंडित /सौ. मंजुषा मुळे/सौ. गौरी गाडेकर≈