कविराज विजय यशवंत सातपुते
कवितेचा उत्सव # 157 – विजय साहित्य
☆ स्वामी विवेकानंद – तेजोमयी दीपस्तंभ ☆ कविराज विजय यशवंत सातपुते ☆
(स्वामी विवेकानंद जयंती निमित्त)
बंधु आणि भगिनीनो
त्रिखंडात बोल गाजे
कलागुणी वक्तृत्वाने
युवकांचे झाले राजे…….१
ध्येय वादी संघटन
युवकांना दिशादायी
रूजविली अंतर्यामी
नीतिमत्ता ठायी ठायी…….२
सा-या विश्वाला प्रेरक
अशी शक्ती शब्दांकित
स्वामी विवेकानंदांचे
कार्य झाले मानांकित ……..३
काव्य, शास्त्र विनोदाचे
अलौकिक संकलन
रामकृष्ण हंस ज्ञानी
ज्ञानमयी संचलन……..४
शिकागोची परिषद
कार्य कर्तुत्वाला गती
ज्ञानयोगी नरेंद्राची
तेजोमय कळे मती………५
हिंदू धर्म प्रचारक
युवकांना दिले बल
तत्वज्ञान, आत्मज्ञान
संस्कारीत कर्मफल…….६
रामकृष्ण मिशनने
व्यक्तीमत्व घडविले
तेजोमयी दीपस्तंभ
अंतरात जडविले …….७
© कविराज विजय यशवंत सातपुते
मोबाईल 8530234892/ 9371319798.
≈संपादक – श्री हेमन्त बावनकर/सम्पादक मंडळ (मराठी) – सौ. उज्ज्वला केळकर/श्री सुहास रघुनाथ पंडित /सौ. मंजुषा मुळे/सौ. गौरी गाडेकर≈