कविराज विजय यशवंत सातपुते

? कवितेचा उत्सव # 167 – विजय साहित्य ?

☆ शहिद दिनाची शब्द पुष्षांजली ✒ श्रद्धांजली…! ✒ ☆ कविराज विजय यशवंत सातपुते ☆

इतिहास पानी    

समर्पण  साजे

बलिदान गाजे    

शहिदांचे.. . !

 

हसत हसत   

गेले फासावर

कार्य खरोखर  

हौतात्म्यांचे. . . !

 

जहाल क्रांतीचे

यज्ञकुंड जळे

रक्त सळसळे 

आहुतीस. . . . !

 

भगतसिंग नी 

सुखदेव साथ

राजगुरू हात 

एकत्रित.. . . !

 

इन्कलाब नारा 

केला झिंदाबाद

गेले निर्विवाद  

फासावर .. . . !

 

जालियन वाला 

हत्याकांड रोष

मनामध्ये घोष   

सूड हवा.  . . . !

 

नेमबाजी मध्ये 

नाही बरोबरी

शिवराम हरी    

राजगुरू. . . . !

 

लालाजींची हत्या 

घेतलासे सूड

पेटविले धूड     

सॅन्ड्रसचे.. . . !

 

बलवंत सिंग 

करी प्रबोधन

देशप्रेम मन

गुंतलेले. . . . !

 

भगतसिंग हा 

धाडसाचे बोट

घडविला स्फोट

असेंब्लीत.. . . !

 

लायपूर गावी

मित्र  सुखदेव

नसे मुळी भ्येव

मरणाचे.. . . . !

 

लाहोर कटात 

आरोपींचा नेता

ठरला विजेता 

मृत्युंजयी.. . . !

 

देशासाठी केले 

सर्वेस्वाचे दान

अंतरात स्थान

कालातीत… . . !

 

अशा शहिदांचे

बलिदान ताजे

देशभक्ती गाजे

त्रिखंडात…!

 

शहिद दिनाची 

शब्द पुष्षांजली

वाहू श्रद्धांजली

शहिदांस…..!

 

© कविराज विजय यशवंत सातपुते

सहकारनगर नंबर दोन, दशभुजा गणपती रोड, पुणे.  411 009.

मोबाईल  8530234892/ 9371319798.

≈संपादक – श्री हेमन्त बावनकर/सम्पादक मंडळ (मराठी) – सौ. उज्ज्वला केळकर/श्री सुहास रघुनाथ पंडित /सौ. मंजुषा मुळे/सौ. गौरी गाडेकर≈

image_printPrint
5 1 vote
Article Rating

Please share your Post !

Shares
Subscribe
Notify of
guest

0 Comments
Oldest
Newest Most Voted
Inline Feedbacks
View all comments