कविराज विजय यशवंत सातपुते
कवितेचा उत्सव # 175 – विजय साहित्य
☆ माय…! ☆ कविराज विजय यशवंत सातपुते ☆
☆
लाख संकटे भोवती
तरी माय झुंजतसे
लेकराच्या सुखासाठी
जखमांनी गुंजतसे. ..!
अशी धाडसी करारी
माय लेकरा घडवी
नियतीच्या आघातात
भल्या भल्यांना रडवी …!
दिस आजचा भागला
चिंता उद्याची लागली
लेकराला घेऊनीया
माय रानात धावली. ..!
हाल अपेष्टा सोसून
माय पुढे चाललेली.
तिच्या घरची लक्ष्मी
कडेवरी निजलेली. ..!
संकटाशी झुंजायाचं
बाळकडू देते माय
ऊन वारा पावसात
माय सोबतीला र्हाय. ..!
दारीद्र्याच भोग असे
कधी पांग फिटणार
लेकराच्या सुखासाठी
माय स्वप्ने झेलणार…!
☆
© कविराज विजय यशवंत सातपुते
सहकारनगर नंबर दोन, दशभुजा गणपती रोड, पुणे. 411 009.
मोबाईल 8530234892/ 9371319798.
≈संपादक – श्री हेमन्त बावनकर/सम्पादक मंडळ (मराठी) – सौ. उज्ज्वला केळकर/श्री सुहास रघुनाथ पंडित /सौ. मंजुषा मुळे/सौ. गौरी गाडेकर≈