कविराज विजय यशवंत सातपुते
कवितेचा उत्सव # 181 – विजय साहित्य
☆ 🌼 पांडुरंग…! 🌼 ☆ कविराज विजय यशवंत सातपुते ☆
वारकरी पंथ । झाला एकरूप ।।
दावी निजरूप । पांडुरंग ।।१।।
युगे अठ्ठावीस । वाहे चंद्रभागा ।।
अंतरात जागा । पांडुरंग ।।२।।
माळ वैजयंती । हात कटीवर ।।
शोभे रमावर । पांडुरंग ।।३।।
संत सज्जनांची । पुण्यमयी ठेव।।
आशिर्वादी पेव। पांडुरंग ।।४।।
वैष्णवांचा मेळा । करीतसे वारी ।।
कैवल्य कैवारी । पांडुरंग ।।५।।
हरिनाम मुखी। सदा घेत जाऊ ।।
जीवनात पाहू । पांडुरंग ।।६।।
कविराज वाणी । चिंतनात रंग।।
जोडीला व्यासंग । पांडुरंग ।।७।।
© कविराज विजय यशवंत सातपुते
सहकारनगर नंबर दोन, दशभुजा गणपती रोड, पुणे. 411 009.
मोबाईल 8530234892/ 9371319798.
≈संपादक – श्री हेमन्त बावनकर/सम्पादक मंडळ (मराठी) – सौ. उज्ज्वला केळकर/श्री सुहास रघुनाथ पंडित /सौ. मंजुषा मुळे/सौ. गौरी गाडेकर≈