कविराज विजय यशवंत सातपुते
कवितेचा उत्सव # 182 – विजय साहित्य
☆ 🌼 ध्येय निष्ठा…! 🌼 ☆ कविराज विजय यशवंत सातपुते ☆
(स्वामी विवेकानंद स्मृती दिनानिमित्त)
स्वामी विवेकानंदांचे
दिव्य स्थान अंतरात
दत्त नरेंद्र नाथ हे
मुळ नाव दिगंतात…!
राम कृष्णांचा संदेश
पोचविला जगतात
रामकृष्ण मिशनाचे
कार्य जागे काळजात..!
पाश्चिमात्य तत्वज्ञान
घनिभूत देशभक्ती
स्वामी विवेकानंदांची
तर्कशास्त्र ध्येयासक्ती..!
सर्वधर्म परीषद
वेदांताचा पुरस्कार
भारतीय संस्कृतीचा
केला प्रचार प्रसार..!
गर्व,पैसा,कींवा भूक
नको अती उपभोग
अती हव्यासाने होई
वीषमयी नानारोग..!
भारतीय दृष्टीकोन
विचारांचे दिले धन
सर्वांगीण विकासात
सेवाभावी तनमन..!
स्वामी विवेकानंदाचा
शब्द शब्द मौल्यवान
कार्य कर्तृत्वाचे यश
व्यासंगात परीधान…!
स्वामी विवेकानंदाची
दिव्य जीवन प्रणाली
एका एका अक्षरांत
ध्येय निष्ठा सामावली…!
© कविराज विजय यशवंत सातपुते
सहकारनगर नंबर दोन, दशभुजा गणपती रोड, पुणे. 411 009.
मोबाईल 8530234892/ 9371319798.
≈संपादक – श्री हेमन्त बावनकर/सम्पादक मंडळ (मराठी) – सौ. उज्ज्वला केळकर/श्री सुहास रघुनाथ पंडित /सौ. मंजुषा मुळे/सौ. गौरी गाडेकर≈