मराठी साहित्य – कविता ☆ श्री गणेश जयंती विशेष – मोरया रे ☆ श्री अशोक श्रीपाद भांबुरे
श्री अशोक श्रीपाद भांबुरे
(वरिष्ठ मराठी साहित्यकार श्री अशोक श्रीपाद भांबुरे जी का अपना एक काव्य संसार है । आप मराठी एवं हिन्दी दोनों भाषाओं की विभिन्न साहित्यिक विधाओं के सशक्त हस्ताक्षर हैं। आज प्रस्तुत है श्री गणेश जयंती पर विशेष कविता / गीत “ मोरया रे”।)
☆ श्री गणेश जयंती विशेष – मोरया रे☆
मोरया रे मोरया रे बाप्पा मोरया रे
चमक तुझ्या बुद्धीची जणू सूर्या रे ॥ध्रु॥
आदि शक्ती आदि भक्ती सर्व कार्या रे
रिद्धी आणि सिद्धी दोन्ही तुझ्या भार्या रे ॥1॥
किती खाशी मोदक, मस्तकी दुर्वा रे
लंबोदरामधे तुझ्या जणू दर्या रे ॥2॥
धाव घेशी सज्जनांच्या शुभ कार्या रे
दुर्जनांचा वाजवशी तूच बोर्या रे ॥3॥
लोभस वाटे मजला तुझी चर्या रे
माताही लाभली तुला एक आर्या रे ॥4॥
© अशोक श्रीपाद भांबुरे
धनकवडी, पुणे ४११ ०४३.
मो. ८१८००४२५०६, ९८२२८८२०२८