सुश्री मीनाक्षी सरदेसाई
(वरिष्ठ मराठी साहित्यकार सुश्री मीनाक्षी सरदेसाई जी मराठी साहित्य की विभिन्न विधाओं की सशक्त हस्ताक्षर हैं। कई पुरस्कारों/अलंकारों से पुरस्कृत/अलंकृत सुश्री मीनाक्षी सरदेसाई जी का जीवन परिचय उनके ही शब्दों में – “नियतकालिके, मासिके यामध्ये कथा, ललित, कविता, बालसाहित्य प्रकाशित. आकाशवाणीमध्ये कथाकथन, नभोनाट्ये , बालनाट्ये सादर. मराठी प्रकाशित साहित्य – कथा संग्रह — ५, ललित — ७, कादंबरी – २. बालसाहित्य – कथा संग्रह – १६, नाटिका – २, कादंबरी – ३, कविता संग्रह – २, अनुवाद- हिंदी चार पुस्तकांचे मराठी अनुवाद. पुरस्कार/सन्मान – राज्यपुरस्कारासह एकूण अकरा पुरस्कार.)
अब आप सुश्री मीनाक्षी सरदेसाई जी के साप्ताहिक स्तम्भ – मीनाक्षी साहित्य को प्रत्येक बुधवार आत्मसात कर सकेंगे । आज प्रस्तुत है आपकी एक सार्थक कविता मी सरपंच झाले .
☆ साप्ताहिक स्तम्भ – मीनाक्षी साहित्य – मी सरपंच झाले – ☆
डोईवर पदर,
खाली नदर,
सही भाद्दर,
अशी मी निवडून आले,
राखीव कोट्यातून सरपंच झाले.
तू हुबा रहायचं
हात जोडायच,
जादा न्हाई बोलाय,
असं मला धनी म्हनाले,
अन् मी सरपंच झाले. ।।
आम्ही करतो परचार ,
अजब कारभार,
तुला न्हाई जमनार,
मालकांचे बोल मी आयकले
नि गुमान हुबी मी रहायले ।।
खुर्चीवर मी,
शोभेची रानी,
मागे घरधनी,
हुकूम झेलत रहायले।
नि नावाची सरपंच झाले।
चुलीतली अक्कल,
लडवुन शक्कल,
देऊन टक्कर,
डावपेच शिकुन घेतले
नि शेराला सव्वाशेर ठरले ।।
पर एके दिवशी,
फुडल्याच वर्षी,
करून सरशी
रावांना मागे मी सारले
नि सोताच कामाला लागले।
आता मी शानी ,
हुकमाची रानी,
गावाची वयनी,
गावाला नंबरात आनले
नि आदर्श सरपंच झाले ।।
© मीनाक्षी सरदेसाई
मोबाईल नंबर 9561582372, 8806955070
अच्छी रचना