कवी राज शास्त्री
(कवी राज शास्त्री जी (महंत कवी मुकुंदराज शास्त्री जी) का ई- अभिव्यक्ति में हार्दिक स्वागत है। आप मराठी साहित्य की आलेख/निबंध एवं कविता विधा के सशक्त हस्ताक्षर हैं। मराठी साहित्य, संस्कृत शास्त्री एवं वास्तुशास्त्र में विधिवत शिक्षण प्राप्त करने के उपरांत आप महानुभाव पंथ से विधिवत सन्यास ग्रहण कर आध्यात्मिक एवं समाज सेवा में समर्पित हैं। विगत दिनों आपका मराठी काव्य संग्रह “हे शब्द अंतरीचे” प्रकाशित हुआ है। ई-अभिव्यक्ति इसी शीर्षक से आपकी रचनाओं का साप्ताहिक स्तम्भ आज से प्रारम्भ कर रहा है। आज प्रस्तुत है आपकी एक भावप्रवण कविता “वृद्धा:श्रम”)
☆ साप्ताहिक स्तम्भ – हे शब्द अंतरीचे # 8 ☆
☆ वृद्धा:श्रम ☆
ती आणि तो
तिला तो आवडला
त्याला ती आवडली
दोघेपण एकमेकांच्या
जवळ आले एकमेकांना ओळखू लागले असेच काही दिवस गेले
दोघे ही एकमेकांच्या प्रेमात पडले लग्न झाले, संसार सुखाचा सुरू झाला.
निसर्ग नियम, त्यांच्या संसार वेलीवर एक गोंडस फुल उमलले.
पाहता पाहता वेळ भरपूर निघून गेला
परिस्थिती बदलली, तिला फक्त तोच हवा वाटू लागला
सासू सासरे, नको वाटू लागले.
भांडण सुरू झाले, उपास तापास लटके ओरडणे गोंधळ उडाला.
त्याला काय करावं कळेनासे झाले
इकडे आड तिकडे विहीर अशी त्याची गत झाली.
आई, वडील, की पत्नी…?
कोणाची निवड करावी…. त्याचीच त्याच्या सोबत प्रश्न मंजुषा सुरू झाली.
आणि एके दिवशी नको तेच झालं, तिनं स्वतःला खोटं खोटं, पेटवून घेतलं…
तो आला तिला सावरलं मात्र ती त्याला काही बोललीच नाही, प्रतिसाद सुद्धा दिला नाही. ओळख असून अनोळखी असल्यासारखे वर्तन ती करू लागली, तिला पाहिजे ते त्याने करावे हेच तिचे आग्रहाचे आणि शेवटचे ठाम मत तिने तिच्या कर्मातून त्याला निदर्शनास आणुन दिले…
शेवटी निर्णय झाला आई,वडील वृद्धाश्रमात दाखल झाले…….
एकच प्रश्न मी इथे उपस्थित
करतो… प्रेम होणे गुन्हा आहे, का लग्न झाले तो गुन्हा होता.
ज्या मुलाला लहानाचा मोठा
केला त्यानेच आपल्या आई,बापाला घरातून बाहेर
काढून वृद्धाश्रम दाखवला.
मग अशाने कसे होईल, कुठे गेली ती,
“मातृ देवो भव: पितृ देवो भव:”
म्हणणारी पवित्र भारतीय संस्कृती….
कुणाच्याच आयुष्यात असे नको व्हायला…
नको तो तुरुंगवास…
नको नरक यातनांनी भरलेलं ते जीवन.
शेवटी समारोप करतांना मला हेच म्हणावे वाटतं आहे की…
जपा संस्कृती,
वारसा तो आपला
आई, वडिलांनी जन्म दिला
सोहळा त्यामुळेच साजरा झाला.
फक्त नांदा सौख्यभरे…
© कवी म.मुकुंदराज शास्त्री उपाख्य कवी राज शास्त्री.
श्री पंचकृष्ण आश्रम चिंचभुवन,
वर्धा रोड नागपूर,(440005)
मोबाईल ~9405403117, ~8390345500
मार्मिक चित्रण