कविराज विजय यशवंत सातपुते
☆ साप्ताहिक स्तम्भ # 72 – विजय साहित्य – भारतीय मी ☆ कविराज विजय यशवंत सातपुते ☆
(अष्टाक्षरी रचना)
पद, पैसा, प्रतिष्ठेत
हवी जाग्रृत सन्मती
कार्यरत कर्तृत्वाने
यश कीर्ती मिळे गती. . . !
भारतीय मी जाहलो
आशिर्वाद माऊलीचा
मतदान अधिकार
संविधान प्रणालीचा….!
भारतीय शब्द दावी
प्रकाशाची नवी वाट
ध्येय प्राप्ती देई यश
चैतन्याचा मनी लाट….!
भारतीय नाही पद
आहे एक अधिकार
कार्य प्रवणता हवी
नको गर्व अहंकार. . . . !
कष्टसाध्य कर्तृत्वाचे
भारतीय आहे फळ
उतू नये, मातू नये .
कार्याप्रती कळकळ .. . . . !
ज्याने दाखवली वाट
त्याला कधी सोडू नये.
देशभक्ती, देशसेवा
गुरूजना टाळू नये. . . . . !
भारतीय शब्दामधे
आहे माणसाचे रूप .
पदोपदी जाणवते
त्याचे सगुण स्वरूप…!
© विजय यशवंत सातपुते
यशश्री, 100 ब दीपलक्ष्मी सोसायटी, सहकार नगर नंबर दोन, पुणे 411 009.
मोबाईल 9371319798
≈ ब्लॉग संपादक – श्री हेमन्त बावनकर/सम्पादक मंडळ (मराठी) – श्रीमती उज्ज्वला केळकर/श्री सुहास रघुनाथ पंडित ≈
छान कविता